दि. २५ 

इंदापूर : भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी परंपरेनुसार दसऱ्याचा उत्सव बावडा येथे रत्नाई निवासस्थानी ग्रामस्थ व कार्यकर्त्यासमवेत मंगळवारी ( दि.२४) सायंकाळी उत्साही वातावरणात साजरा केला. यावेळी हर्षवर्धन पाटील, युवा नेते राजवर्धन पाटील यांनी आयोजित समारंभामध्ये ग्रामस्थ व कार्यकर्त्यांना विजयादशमीनिमित्त आपट्याची पाने देऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

        भारतीय संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्ता पैकी एक असलेला सण म्हणजे दसरा! l यानिमित्ताने हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील व पाटील कुटुंबीयांनी बावडा येथे ग्रामस्थांशी संवाद साधला व ज्येष्ठांचे आशीर्वादही घेतले. 

          आपले आपुलकीचे व प्रेमाचे नाते या शुभदिनी अधिक दृढ व्होवो, अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. जनतेमधील सामाजिक एकोपा आगामी काळात अधिक दृढ व्हावा तसेच प्रत्येक घराघरात सुख, शांती, समृद्धी वाढीस लागावी, अशी भावनाही याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *