दि. ३१ ऑक्टोबर

उजनी टे ता माढा ग्रामपंचायत सदस्या सौ कल्याणी मल्हारी गवळी यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा देऊन मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा जाहीर केला.सौ कल्याणी मल्हारी गवळी यांनी मातंग समाजाचे नेतृत्व करत असताना आम्हाला आरक्षण आहे म्हटल्यावर मराठा समाजाला सुद्धा आरक्षणाची गरज आहे.कल्याणी गवळी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला नमन करून आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. उदात्त हेतूने आपण हा निर्णय घेतल्याचे व मराठा समाजाप्रती सद्भावना व्यक्त करत समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी गेली कित्येक दिवस अन्न पाणी न घेता उपोषण सुरू असून आपणही मराठा समाजाचे देणे लागतो असे मत व्यक्त केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मातंग समाजाच्या पहिल्या महिला ग्रामपचायत सदस्य पदाचा राजीनामा सौ कल्याणी गवळी यांनी दिला असल्याने आरक्षणाची धग आता अधिकच तीव्र झाली आहे.
