दि. ३१ ऑक्टोबर

इंदापूर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील या संघर्ष योद्धाने आपले प्राण पणाला लावले आहेत. यासाठी मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला असतानाच काटी वडापुरी जिल्हा परिषद गटातील मौजे बाभूळगाव च्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या व माजी सरपंच शैला सोमनाथ जावळे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

आरक्षणाचा प्रश्न लवकर निकाली निघाला नाही तर गावागावातून अनेक ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकारी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक समजते. 

               संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाला आरक्षणाशिवाय उपोषणापासून मागे हटणार नाही असा निर्वाणीचा इशारा दिल्यामुळे मराठा समाजामध्ये सरकार विषयी प्रचंड चिड निर्माण झाली आहे. लोकनियुक्त ग्रामपंचायत सदस्या पासून लोकसभेच्या सदस्या पर्यंत अनेक जण आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.आज बाभुळगावच्या माजी सरपंच व विद्यमान सदस्या शैला सोमनाथ जावळे यांनी ग्रामस्थां समवेत गावातच एकदिवसीय लाक्षणीक उपोषण करून आपल्या पदाचा राजीनामा सरपंचाकडे सुपूर्द केला आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची धग वाढत असून सरकार आपला निर्णय येत्य २४ तासात जाहीर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *