दि. ५ नोव्हेंबर

इंदापूर : शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याने चालु सन 2023-24 च्या हंगामामध्ये गाळप होणाऱ्या ऊसाला पहिला हप्ता प्रति टन रु. 2700 प्रमाणे जाहीर केला असून, त्यानंतरही ऊस बिलाचे पुढील हप्ते इतर कारखान्यांप्रमाणे दिले जातील, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी रविवारी (दि.5) दिली.

         निरा भिमा कारखाना चालू होणाऱ्या गळीत हंगामात इतर कारखान्यांच्या बरोबरीने शेतकऱ्यांना ऊस दर देणार आहे. कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली चालु गळीत हंगामामध्ये 6 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चितपणे पुर्ण केले जाईल, त्या दृष्टीने संचालक मंडळाने नियोजन केले आहे. कारखान्याची ऊस तोडणी वाहतुकीची सर्व यंत्रणा उत्कृष्टरित्या कार्यान्वित झालेली आहे. 

          चालू गळीत हंगामामध्ये गाळप होणाऱ्या ऊसाची सर्व बिले तसेच तोडणी, वाहतूक कंत्राटदारांची बिले ही नियमितपणे देण्याचे सर्व नियोजन कारखान्याने केले आहे. तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपला सर्व ऊस नीरा भीमा कारखान्यास गाळपासाठी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी अध्यक्ष लालासाहेब पवार व संचालक मंडळाने केले आहे. 

       यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, दत्तात्रय पोळ, कमाल जमादार, कार्यकारी संचालक हेमंत माने उपस्थित होते.

____________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *