दि. ६ नोव्हेंबर

इंदापूर : संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुणे येथे निसर्ग पक्ष कार्यालयात सामाजिक कार्यकर्त्या रेशमा शेख यांची सामाजिक न्याय विभाग (शरद पवार गट) च्या शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली यावेळी सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्ह अध्यक्ष सागर बबा मिसाळ, तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील , कार्याअध्यक्ष महारुद्र पाटील, महिला आघाडी च्या तालुका अध्यक्ष छायाताई पडसळकर व महिला पुरूष पदाधिकारी उपस्थित होते

दि. ५ नोव्हेंबर रोजी पुणे येथील निसर्ग पक्ष कार्यालय येथे छोटेखानी कार्यक्रमात अनेक नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले. 

रेश्मा शेख या गेल्या दहा वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. विशेषता महिला सक्षमीकरणासाठी त्या नेहमी अग्रेसर असतात. महापुरुषाचे विचारधारेवरच त्या नेहमी ठाम असतात. सध्या त्या इंदापूर पोलीस स्टेशनच्या दक्षता समितीवर कार्यरत असून एका सामाजिक संघटनेच्या प्रदेश स्तरावरच्या पदाधिकारी आहेत. त्यांच्या निवडीचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर बाबा मिसाळ , राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष एडवोकेट तेजसिंह पाटील, तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुका अध्यक्ष छायाताई पडसळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

 

नवनियुक्त पदाधिकारी पुढील प्रमाणे

 

महादेव कोंडरे : जिल्हा कार्याध्यक्ष

पत्रकार दादासाहेब थोरात : जिल्हा प्रवक्ता

संजय दुपारगुडे : तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग

विकास खिलारे : तालुका कार्याध्यक्ष सामाजिक न्याय

विकास भोसले : तालुका कार्याध्यक्ष सामाजिक न्याय

अनिल दादा ढावरे : इंदापूर शहराध्यक्ष सामाजिक न्याय

श्रीकांत मखरे : इंदापूर शहर कार्याध्यक्ष सामाजिक न्याय

मालोजी शेंडगे : जिल्हा सरचिटणीस

दत्तात्रय माने (माजी उपसरपंच काटी) : जिल्हा संपर्कप्रमुख

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *