दि. ९ नोव्हेंबर

इंदापूर : तालुक्यातील भांडगाव येथील रामोशी समाजातील अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व्हावी या प्रमुख मागणीसाठी जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली इंदापूर तहसीलवर निषेध मोर्चा काढण्यात आला.

सविस्तर माहिती अशी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

दिनांक १ नोव्हेंबर रोजी भांडगाव येथील रहिवाशी असलेले सुदाम रामचंद्र तरंगे या युवकाने गावातच रहाणार्या रामोशी समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून घरातुन उचलुन नेउन जबरदस्तीने तोंड दाबून धरून तिच्यवर बलात्कार केला सदर आरोपीवर पासको व कायदा कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल आहे परंतु सदर गुन्हा फास्ट ट्रॅक (जलदगती न्यायालयात) कोर्टात चालवून आरोपीला जन्म ठेपेची शिक्षा करण्यात यावी व पिडीतेला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

यावेळी शिवधर्म फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व भाजपा युवा मोर्चा चे प्रदेश सचिव दीपक अण्णा काटे यांनीही मनोगत व्यक्त केले व आपण पिडीत कुटूंबाला न्याय मिळेपर्यंत पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.

यावेळी कोमलताई चव्हाण (महिला प्रदेश उपाध्यक्ष), अंकुश जाधव (प्रदेश उपाध्यक्ष), कल्याण भंडलकर (तालुका अध्यक्ष) यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी संघटनेतील अनेक पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते

यावेळी भांडगाव चे शाखाध्यक्ष दत्ता जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले व घडलेली घटना कथन केली.

निषेध मोर्चा मधील मागण्यचे निवेदन तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी स्विकारले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *