दि. ९ नोव्हेंबर

आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे उद्घाटन तहसीलदार श्रीकांत पाटील व पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या हस्ते संपन्न.

 

 

आमचे मेंबर परिवाराचे प्रमुख अनिल पवार यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ४८२ बॅग रक्त संकलन

 

तर ७०० च्या वरती नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

 

 

इंदापूर

 

आमचे मेंबर परिवाराचे प्रमुख अनिल पवार यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ४८२ बॅग रक्त संकलन झाले असून ७०० च्या वरती नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आहे.

आमचे मेंबर परिवाराचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते अनिल (आण्णा) पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त इंदापूर शहरांमध्ये भव्य आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन इंदापूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक दिलीप पवार , सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार ,वैद्यकीय सेवेतील नामवंत डॉक्टर मिलिंद खाडे, रोहिदास थोरवे, यांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार, वैद्यकीय सेवेतील मधील डॉ.मिलिंद खाडे, डॉ. रोहिदास थोरवे, डॉ. मगर, डॉ. कदम, अॅड .तानाजीराव देवकर तसेच सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा साहित्य ,क्षेत्रातून विविध मान्यवर तसेच आजी माजी नगरसेवक, विविध गावचे सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग, आमचे मेंबर परिवाराचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

याप्रसंगी बोलताना इंदापूरचे तहसीलदार म्हणाले की, वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत आहेत, कोणी अनाठायी खर्च करून करतात, कोणी वेगवेगळ्या पद्धतीने करतात , पण आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर , सामाजिक उपक्रम अभिष्टचिंतन (वाढदिवसाच्या)दिवशी ठेवण्यासाठी रक्त शुद्ध आणि रक्तातच गुण लागतात. २०१६ पासून मी इंदापूर येथे प्रशासकी अधिकारी म्हणून काम करत आहे. तेव्हापासून पाहत आहे की, कधीही, केव्हा ही काळ्यारात्री हाक दिल्यास त्या हाकेला उभा राहणारा युवक म्हणून आण्णांची ओळख आहे. खूप कमी लोक असतात ते आपल्या कार्याने, आपल्या वागण्याने प्रसिद्ध असतात.

 

 

आपला माणूस म्हणून आपल्या समाजाचे भलं व्हावं म्हणून सदैव पुढे असतात . विविध राजकीय पक्ष सन्मान करतात. सर्वांचं कल्याण हो अशी भावना ठेवणारा,प्रामाणिकपणाने काम करणारा माणूस म्हणून ओळख आहे आणि प्रशासनाला अशा माणसाची गरज असते. प्रशासकीय अधिकारी सुद्धा माणूसच असतो. ज्यावेळेस चांगली माणसं , आणि प्रशासन चांगल्या प्रश्नासाठी एकत्र येतात तेव्हा समाजासाठी चांगले काम करतात.आमचे मेंबर परिवाराने जो उपक्रम हाती घेतला तो गौरविण्यात करण्याजोग आहे. आण्णांचे भविष्य उज्वल आहे.

 

गोरगरिबासाठी प्रामाणिक काम करणारा माणूस म्हणून आण्णाची ओळख आहे. प्रशासन सदैव आण्णांच्या चागल्या कामासाठी पाठीशी असते. प्रशासनाची कुठल्याही अडचणीला किंवा गोरगरीचा अडचणीला धावून जाणारा माणूस आहे अशा शब्दात इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

 

अनिल पवार यांनी समाजापुढे एक आदर्श घालून दिला.- पोलिस निरीक्षक दिलीप पवार

 

 

इंदापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दिलीप पवार म्हणाले, अनिल (आण्णा) पवार यांनी समाजापुढे एक आदर्श घालून दिलेला आहे. समाजापुढे आदर्श ठेवणारा तरुण म्हणून अनिल (आण्णा) पवार यांची ओळख आहे . विविध राजकीय पक्षातील नेते वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करणे, हॉटेलवर युवकांना वेगळ्या पद्धतीने पार्टी देणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *