दिनांक २९ नोव्हेंबर

इंदापूर : आज इंदापूर येथे शासकीय विश्राम गृहात नाभिक समाजाची येत्या ९ डिसेंबर रोजी इंदापूर येथे होणाऱ्या ओबीसी च्या एल्गार महामेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातून व जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने नाभिक समाज उपस्थित राहणार आहे असे रमेश राऊत माजी जिल्हाध्यक्ष नाभिक महामंडळ यांनी सांगितले 

रमेश राऊत म्हणाले की संख्येने कमी असणारा नाभिक समाज हा शब्दाला पक्का असतो त्याच्या वाट्याचे कोणी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला कडाडून विरोध करेल कारण आमच्याही येणाऱ्या पिढीचा व मुलाबाळाचा प्रश्न आहेच. नाभिक समाजातील अनेकांनी राजकारण व समाजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे महाराष्ट्रात व महाराष्ट्र बाहेर ग्रामपंचायत सरपंच पासून ते पंतप्रधानापर्यंत या समाजांनी पदे भूषविले व आजही आमच्यासारखे असंख्य तरुण समाजातील प्रश्न शासन दरबारी आक्रमकपणे मांडत आहे

महाराष्ट्रात आरक्षणाचा संघर्ष उभा राहिला आहे. मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश व्हावा यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला वेठीस धरले आहे . मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे परंतु आमच्या हक्काच्या ओबीसी प्रवर्गातून न देता त्यांच्यासाठी वेगळा प्रवर्ग निर्माण करावा यासाठी ओबीसी नेते व विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे व त्यांनी देखील महाराष्ट्रामध्ये जाहीर सभा घेऊन ओबीसी प्रवर्गात असणाऱ्या एकूण जाती एकाच छताखाली आणण्यासाठी ओबीसी एल्गार महामेळाव्याचे आयोजन पुकारले आहे. व त्याचाच एक भाग म्हणून येत्या ९ डिसेंबर रोजी इंदापूर येथे ओबीसी एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ओबीसी एल्गार महामेळाव्यात नाभिक समाज इंदापूर तालुक्यातून व पुणे जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने आपले व्यवसाय एक दिवसासाठी बंद ठेवून सहभागी होणार असल्याचे रमेश राऊत यांनी जाहीर केले.

यावेळी तालुकाध्यक्षअवधूत पवार म्हणाले की ९ डिसेंबर रोजी ओबीसी नेते व विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ओबीसी एल्गार महामेळाव्यासाठी तालुक्यातून नाभिक समाज बांधव आपली दुकाने बंद ठेवून महामेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत व सर्व समाज बांधवांनी या ओबीसी एल्गार महामेळाव्यासाठी उपस्थित राहावे असेही आवाहन केले.

या नियोजन बैठकीसाठी उपस्थित असणारे क्रांतीज्योती विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष व ओबीसी एल्गार महामेळाव्याचे आयोजक पांडुरंग तात्या शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की ओबीसींच्या हक्काची लढाई आपल्यालाच लढावी लागणार आहे. यासाठी भुजबळ साहेबांनी उभा केलेला ओबीसीच्या लढ्याला आपण सर्वांनी साथ देणे गरजेचे आहे व आपण ती साथ द्याल व येत्या ९ डिसेंबरच्या महामेळाव्यासाठी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे असेही आवाहन केले. 

यावेळीशहराध्यक्ष संतोष शिरसागर, वैभव सुर्यवंशी तालुका युवक अध्यक्ष ,पंकज सूर्यवंशी तालुका युवक उपाध्यक्ष ,भागवत जाधव ,माऊली जगताप, बजरंग जगताप, सचिन देवकर, शंकर काशीद, अमित गवळी ,गणेश जगताप, बाभूळगाव चे माजी सरपंच भारत यादव, राजाभाऊ राऊत, योगेश भैया राऊत, राजेंद्र शिंदे, सोमनाथ गाडेकर इत्यादी नाभिक समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी , माळी महासंघाचे पुणे उपजिल्हाध्यक्षअशोक भाऊ देवकर, सागरदादा रायकर, प्रकाश व्यवहारे इत्यादीआवर्जून उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *