दिनांक २ नोव्हेंबर

इंदापूर : वयाच्या २१ व्या वर्षी इंदापूर नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेले,अनेक पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवक पदापासून उपनगराध्यक्ष पदा पर्यंत मजल मारली. नगरसेवक पदी कार्यरत असताना सामान्य लोकांची केलेली कामे व याचीच पोहोच पावती म्हणून पत्नी सौ अलकाताई ताटे यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. प्राध्यापक या नोकरीवरून निवृत्तीनंतरही इंदापूरकरांच्या प्रश्नावर सातत्याने इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनाबरोबर संघर्ष करीत असलेले संघर्ष योद्धा प्राध्यापक कृष्णा ताटे यांनी स्वतःच्या वाढदिवसादिवशी (दि २) इंदापूरकरांच्या प्रश्नासाठी नगरपालिकेसमोर एक दिवसिय लाक्षणिक उपोषण केले. हे उपोषण मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष निळकंठ मोहिते यांच्या हस्ते व अनेक पत्रकार व संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत फळाचा ज्यूस घेऊन मागे घेतले.
प्राध्यापक कृष्णा ताटे हे सतत इंदापूरकरांच्य प्रश्नासाठी नगरपालिका प्रशासनाशी लोकशाहीच्या माध्यमातून संघर्ष करीत असतात.संघर्ष करीत असताना वैयक्तिक कामे बाजूला सारून सतत लोकांच्या गराड्यात असतात. आज स्वतःचा वाढदिवस असताना देखील शुभेच्छाचा वर्षाव सोशल मीडिया व प्रत्यक्ष भेटून होत असताना देखील इंदापूरच्या जनतेच्या भल्यासाठी हा माणूस नगरपालिकेसमोर लाक्षणिक उपोषणाला बसल्याचे बघून इंदापूरकरांच्या मनात प्राध्यापक कृष्णा ताटे यांच्या विषयी निश्चितच सहानुभूती अनुभवायला मिळाली. संपूर्ण शहरात याची चर्चा होती.
यावेळी भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे प्रदेश सचिव तानाजी धोत्रे, राष्ट्रसेवा दलाचे गफुर सय्यद, रमेश आबा शिंदे, प्राध्यापक महादेव चव्हाण, हमीद आतार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजेंद्र हजारे, नागरी संघर्ष समितीचे अनेक पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
