दि.१५ डिसेंबर

पण धान्य मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन राहणार सुरु
इंदापूर (दि.१४) :- येथील प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे, मुलींचे अनुदानित वसतिगृहात एकूण ३६८ विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत. परंतु शासनाच्या नारी निकेतन योजनेतून वेळोवेळी निवेदने देऊन व आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.राहुल मखरेंनी उपोषण केल्यावर आश्वासन देऊन देखील माहे-ऑक्टोबर २०२३ पासून अद्याप निवासी विद्यार्थ्यांना देय असणारे धान्य मिळाले नसल्याने मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह दि.१४/१२/२०२३ पासून बेमुदत उपोषण सुरू केले होते, परंतु मा. तहसीलदार, इंदापूर यांचे विनंती वरून त्याच दिवशी म्हणजेच दि.१४/१२/२३ रोजी सायं. ठीक ७.४५ वा. नायब तहसीलदार मयूर बनसोडे यांनी उपोषणकर्त्यांना विनंती करत तुमच्या आश्रमशाळेला व वसतिगृहांना ८ दिवसाचे आत धान्य वितरित करतो असे आश्वासन देऊन उपोषण सोडवले.
यावेळी उपोषण कर्त्यांच्या वतीने ॲड. समीर मखरे म्हणाले की, आम्ही तुमच्या विनंतीला मान देऊन उपोषण सोडत आहोत परंतु दि.१५/१२/२३ पासून धान्य मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन आम्ही सुरू ठेवणार आहोत.
ॲड.मखरे पुढे म्हणाले की,जर तुम्ही दिलेल्या मुदतीच्या आत धान्य न दिल्यास दि.२६/१२/२०२३ पासून आम्ही आमच्या आश्रमशाळेचे विद्यार्थी कचेरीत आणून दररोज शाळा तहसील कचेरीतच भरवू असे यावेळी नमूद केले.
यावेळी संस्थेचे संचालक गोरख तिकोटे, संजय कांबळे आदी उपस्थित होते.
