दि.१५ डिसेंबर

११६ रक्तदात्यांनी केले रक्तदान
वरवडे/ टेंभुर्णी प्रतिनिधी
मातंग एकता आंदोलन संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक अविनाश जी बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त मातंग एकता आंदोलन माढा तालुका यांच्या वतीने वरवडे तालुका माढा येथे दिनांक 14 /12/ 2023 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले व वरवडे गावच्या सरपंच पदी नागनाथ पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला या रक्तदान शिबिरामध्ये 116 रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम उर्फ बंडू नाना ढवळे जलतज्ञ अनिल पाटील जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा वरवडे गावचे सरपंच नागनाथ पाटील माजी सरपंच प्रताप हनुमंत घाडगे ज्येष्ठ नेते माजी सरपंच हनुमंत तात्या घाडगे उपसरपंच सिद्धेश्वर भोसले भारत आप्पा गायकवाड ग्रामपंचायत सदस्य रविकांत मेन कुदळे हनुमंत गरड प्रदीप वाजाळे माजी सरपंच रमेश कसबे सिद्धेश्वर घाडगे मातंग एकता आंदोलन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य उदय जाधव मेंबर जिल्हा कार्याध्यक्ष कैलास भालके महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकला ताई खंडागळे स्वातीताई साठे माढा तालुकाध्यक्ष अनिल गवळी विभागप्रमुख अमर कांबळे पत्रकार सागर कांबळे आप्पा भालके धनंजय भालके युवक आघाडी तालुकाध्यक्ष रोहित कांबळे युवक आघाडीचे कुर्डूवाडी शहराध्यक्ष अमन कांबळे टेंभुर्णी शहराध्यक्ष सुनील भाऊ जगताप मोडनिंब शहराध्यक्ष संतोष कसबे युवक आघाडीचे शहराध्यक्ष गोटू दादा खंदारे तानाजी जगताप छगन कसबे कालिदास शिरतोडे संदीप जगताप संस्कार कसबे बंडू कसबे आनंद कसबे विठ्ठल गवळी इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन वरवडे शाखेच्या वतीने तालुका कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर कसबे व शाखा अध्यक्ष महादेव कसबे यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे यांनी मानले
