प्रकाश आरडे (स्वराज्य न्युज)….

इंदापूर : नवीन सन 2024 वर्षांमध्ये जनतेने स्वतःच्या व कुटुंबाच्या प्रगतीसाठी व आरोग्यासाठी नवीन चांगला संकल्प करावा व तो जिद्दीने तडीसही न्यावा. नूतन वर्ष जनतेच्या जीवनामध्ये प्रगतीचे व नवीन उमेद तसेच ऊर्जा देणारे निश्चितपणे असणार आहे, अशा शब्दात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

           नूतन वर्षाच्या निमित्ताने आनंददायी असे नवीन पाऊल टाकू. नवीन आशा आकांक्षा घेऊन सन 2024 हे वर्ष आज सोमवार पासून सुरू होत आहे. या वर्षात जनतेला आनंद, सुख, समाधान, समृद्ध व निरोगी आयुष्य लाभो, अशा सदिच्छा हर्षवर्धन पाटील यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केला.

            जनतेने जीवनाकडे सकारात्मक व आनंदी वृत्तीने पाहिले पाहिजे. आयुष्य म्हटले की चढ-उतार आलेच. त्यामुळे जनतेने निराशाजनक गत अनुभव विसरून आता नवी उमेद, आत्मविश्वास, जिद्द व मेहनतीच्या जोरावर नूतन 2024 वर्षात यशस्वी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच नूतन वर्षामध्ये आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करावे, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी शुभेच्छा देताना जनतेला केले केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *