प्रकाश आरडे…(स्वराज्य न्युज )

इंदापूर : तालुक्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन भाऊसाहेब रुपनवर तालुका कृषी अधिकारी यांनी केले

शासनाचा निधी वरील प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी मंजूर असतो परंतु तो निधी त्या त्या आर्थिक वर्षात खर्च न झाल्यामुळे शिल्लक राहतो व पर्यायाने तोच निधी इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी वापरला जातो. कोणत्याही प्रवर्गातील शेतकरी शासकीय योजना पासून वंचित राहू नये हे शासनाचे धोरण असते. त्यामुळे तालुका कृषि अधिकारी इंदापूर यांचे मार्फत आवाहन करण्यात येते की Mahadbt पोर्टल वर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाचा अनेक योजना मध्ये निधी शिल्लक असल्याने Mahadbt पोर्टल वर ट्रॅक्टर,rotavator, पॉवर टिलर व इतर औजारे,ठिबक,फळबाग लागवड, इलेक्ट्रिक मोटर पंप संच, PVC pipes, शेततळे,mulching,dragon fruit लागवड, व पोर्टल वरील सर्व योजनांसाठी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *