प्रकाश आरडे : स्वराज्य न्युज

 

इंदापूर : (दि. २५ सप्टेंबर ) रिपब्लिकन नेते संजय भैया सोनवणे यांनी त्रस्त वाहन चालक-मालक यांना होणाऱ्या टोल प्रशासनाच्या पिळवणुकीतून सुटका व्हावी या उद्देशाने आंदोलनाची हाक दिनांक २० सप्टेंबर रोजी हिंगणगाव येथील हॉटेल गोकुळ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये दिली होती, या हाकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. याची दखल टोल प्रशासन व पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी घेतली.  त्या अनुषंगाने रिपब्लिकन नेते संजय भैया सोनवणे, पदाधिकारी व टोल प्रशासनातील वरिष्ठ यांच्यासह इंदापूर पोलीस स्टेशन येथे बैठक घेण्यात आली. पोलीस निरीक्षक टि वाय मुजावर यांनी आंदोलक व टोल प्रशासनातील वरिष्ठ  या दोन्ही बाजू ऐकून घेऊन टोल प्रशासनातील वरिष्ठ टोलवा टोलवीच करत आहेत हे ओळखून  पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्याबरोबर पुन्हा एकदा बैठक घेऊन सामोपचारांनी तोडगा काढूया अशी विनंती केली. सरडेवाडी टोल नाका तोडफोड आक्रमक आंदोलनाचे संयोजक रिपब्लिकन नेते संजयभैय्या सोनवणे यांनी तशी तयारी दर्शविली होती.

संजय भैया सोनवणे यांंनी  स्वराज्य न्युज शी बोलताना सांगितले की पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही काही दिवस वाट पाहिली परंतु अद्याप पर्यंत तहसीलदार यांच्या बरोबर चर्चा झाली नाही, अजूनही आमची चर्चेची तयारी आहे आमच्या मागण्याचा गांभीर्यापूर्वक विचार न झाल्यास आम्ही वीस किलोमीटरच्या आतील सर्व गावातील दहा हजार वाहन चालक मालक आपापली चार चाकी वाहने तसेच ट्रॅक्टर, मालवाहतूक ट्रक, जेसीबी, पोकलेन इतर मोठे यांत्रिक वाहनांसह  स्थानिक नागरिक व पदाधिकारी यांना सोबत घेऊन सरडेवाडी टोल नाका तोडफोड आक्रमक आंदोलन करणार आहोत कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्यास सर्वस्वी टोल प्रशासन व संबंधित व्यवस्था जबाबदार राहील.

संजय भैय्या सोनवणे यांनी सांगितले की आंदोलनाची दिशा व नियोजित  आंदोलनाचा दिवस ठरविण्यासाठी मी पदाधिकाऱ्यांसह वीस किलोमीटरच्या आतील सर्व गावातील तरुण व वाहन चालक-मालक यांच्याबरोबर विचारविनिमय बैठका घेत आहे,या बैठकांमध्ये त्रस्त वाहन चालक-मालक व तरुणांमध्ये प्रचंड असंतोष आहे व आक्रमक आंदोलन करण्याची तयारी सर्वांचीच आहे.या त्रस्त वाहन चालक-मालक यांच्या भावनेचा विचार करून व आमच्या मागण्याचा विचार करता आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून मी दहा हजार वाहन चालक-मालक पदाधिकारी,तरुण यांना सोबत घेऊन सरडेवाडी टोल नाक्यावर आक्रमक तोडफोड आंदोलन करणार आहे.कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी टोल प्रशासन व संबंधित यंत्रणेची राहील असेही संयोजक संजय भैय्या सोनवणे यांनी जाहीर केले.

तसे पाहता रिपब्लिकन नेते संजयभैय्या सोनवणे यांची मागील अंदोलने आपल्या मागण्य मान्य झाल्याशिवाय संपलेली नाहीत, त्यामुळे सरडेवाडी टोल तोडफोड आंदोलनाकडे इंदापूर तालुका च नव्हे तर सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *