प्रकाश आरडे :  स्वराज्य न्यूज

माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय मामा भरणे एका भेटी प्रसंगी इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे गेले असता लहान मुले शुभरा अमोल जोशी व अथर्व अमोल जोशी यांनी माजी राज्यमंत्र्याचे स्वागत चॉकलेट देऊन केले,हे अनोखे स्वागत पाहून माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय मामा भरणे भारावून गेले हा स्नेह, जिव्हाळा आमदार दत्तात्रय भरणे यांनी जीवापाड सांभाळलाय.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे वजनदार  खात्याचे मंत्रीपद असताना देखील कोणताही बडेजाव न करता सहज माणसात मिसळल्याने जीवाभावाची माणसे मामांनीजो जोडलेली आहेत. मंत्री पदाचा रुबाब किंवा हवा डोक्यात कधी जाऊ दिली नाही सोबत अंगरक्षक व पोलीस संरक्षण असताना देखील लहान मुले, वयोवृद्ध माणसे यांना आस्थेने विचारपूस करून कामाच्या स्वरूपात मामा म्हणून समोर आलेले दत्तामामा यांच्या विषयी तरुणा बरोबरच लहान मुलांना देखील आपुलकीचे भावना आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कामाच्या स्वरूपात पोहोचण्याची कला इंदापूर तालुक्याचे आमदार माजी राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांना अवगत आहे. म्हणूनच वयोवृद्ध तरुण मुले, शालेय विद्यार्थ्यांबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थी देखील मामाचे चहाते आहेत. एक मात्र निश्चित निमगाव केतकीत लहान मुलांनी चॉकलेट देऊन केलेल्या अनोखे स्वागतामुळे मामा खरोखरच भारावून गेले.

पद येत् जाते पण पदावर असताना ज्या जनतेने आपणास निवडून दिले त्यांच्याशी कसे वागावे याचे भान दत्तात्रय मामा भरणे यांना निश्चितच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *