दिनांक १७ मार्च

इंदापूर : इंदापूर न्यायालयात विधी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला ॲड. रेशमा गार्डे व ॲड. पल्लवी अवचर यांची नुकतीच भारत सरकार नोटरी पदी निवड झाली. यामुळे विधी क्षेत्रातील त्यांच्या सहकार्याबरोबरच समाजातील राजकीय,सामाजिक,धार्मिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे व अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

इंदापूरतील विधी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला प्रथमच भारत सरकार नोटरी पदी नियुक्त झालेल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला देखील कार्यरत आहेत. याच सावित्रीच्या लेकींचा समाजातील विविध घटकांना सार्थ अभिमान आहे.

नुकतीच भारत सरकारच्या नोटरी पदी निवड झालेल्या या दोन्ही महिला वकील इंदापूर न्यायालयात कार्यरत आहेत त्यांच्या या निवडीमुळे संत निरंकारी मंडळ इंदापूर ब्रांच च्या वतीने या दोन्ही महिला वकिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील अनेक महात्मा व बारामती चे गणेश आंबरे जी, व इंदापूर ब्रांच मुखिया शिवाजी अवचर, संचालक प्रकाश दरदरे,शिक्षक अनिल पवार जी, अकाउंटंट विकास सावंत,कॅशियर दिनकर भोई जी व तालुक्यातील सर्व प्रबंधक सेवा दल महापुरुष, नारी इन्चार्ज विजया तोबरे या सर्व महात्म्यांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान केला.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *