दिनांक ,,६ मार्च

इंदापूर : काल (दि५) रोजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तालुक्यातील भाजपा कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न झाला. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देऊन प्रचार करणे संबंधी मार्गदर्शन पर मेळावा होता. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख भाजपा पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.विशेषत: कट्टर पवार विरोधकांची उपस्थिती होती.
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहु लागताच सुनेत्रा पवार यांचेकडे बारामती मतदार संघाच्या संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलें जात होते.आणि अखेर उमेदवारीची घोषणा झाली व सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. त्या वेळेपासून अजित पवार विरोधकांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला आक्षेप घेण्यास सुरुवात केली. हर्षवर्धन पाटील व विजय शिवतारे यांनी कडाडुन विरोध करुन विधानसभेतील पराभवाचा हिशोब चुकता करण्याचा जणु विडाच उचलला.गावोगावचे भाजपा.शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मधील पदाधिकारी व कार्यकर्ते अजित पवार व सत्ताधारी यांच्या कामाच्या पद्धतीवर उघडपणे बोलु लागले.
या सर्व घडामोडी वर प्रथम विजय शिवतारे यांचे बंड शमविण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यश आले. पुढील काही दिवसातच हर्षवर्धन पाटील यांचा देखील विरोध मावळला व देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुका भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करून तक्रारींचा पाढाच वाचून दाखविला. यावेळी हर्षवर्धन पाटील बोलताना म्हणाले की पक्षादेश आम्ही तर पाळुच पण मित्र पक्षांनी देखील महायुतीचा धर्म पाळावा व इंदापूरचे पालकत्व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावे. खोट्या नाट्य पोलीस केसेसला आळा कसा घालता येईल व त्या केसेस करण्यासाठी येणारे फोन बंद झाले पाहिजेत असे जाहीर व्यासपीठावरून ठणकावून सांगितले. त्यावर गृहमंत्री यांनी हर्षवर्धन पाटलासह इंदापूरचे पालकत्व घेतल्याचे जाहीर केले व तालुक्यातील जनतेच्या मनात जे आहे तसेच होईल याबद्दल कसलीही काळजी करू नका असा शब्द दिल्याने पुन्हा एकदा येणाऱ्या विधानसभेला हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी फिक्स झाल्याचे समाधान कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले.
उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापूरच्या जाहीर मेळाव्यात मार्गदर्शन करून गेल्यानंतर ही राष्ट्रवादी व भाजपाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्या ंमध्ये मनोमिलन होऊन महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला एकत्रितपणे इंदापूर विधानसभा मतदार संघामध्ये जाण्याचे अद्याप पर्यंत नियोजन नसल्याने विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांना कठीण जात असल्याचे जाणवत आहे.
एक मात्र नक्की आहे कार्यकर्ते व पदाधिकारी सम्रभाअवस्थेत असून या सर्व घडामोडी वर त्यांचे बारीक लक्ष आहे.
