दिनांक ८ मार्च

 

तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर यांच्या आक्रमक भाषणाची सर्वत्र चर्चा 

इंदापुर : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी मतदार भक्कमपणे उभा असल्याचे चित्र इंदापूर तालुक्यात दिसत आहे.

तालुक्यातील प्रमुख नेते विरोधात असताना देखील सामान्य मतदारांमध्ये सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्या विषयी प्रचंड सहानभूतीची लाट असल्याचे दिसत आहे. शहरापासून गाव खेड्यातील वस्त्यापर्यंत सर्वत्र शरद पवार व सुप्रिया सुळे यांचाच बोलबाला चर्चेतून दिसत आहे. सहज जरी कष्टकरी, शेतकरी,व्यापारी,विद्यार्थी,महिला,ज्येष्ठ यांना निवडणुकीविषयी विचारणा केली असता व चिन्हा विषयी विचारले असता बेधडकपणे सुप्रिया सुळे याच हमखास विजय होणार व त्यांची निशाणी तुतारीच निवडून येणार असे धडाधड बोलून दाखवीत आहेत.

काल (दि७) रोजी इंदापूर तालुक्यात युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभेचे आयोजन केले होते. काटि गावात सभेचे आयोजन केले असत प्रचंड मतदारांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली यावेळी नवमतदारापासून ज्येष्ठापर्यंत महिला, मुली सर्वांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दर्शवीत सभेला हजेरी लावली.

यावरून सध्या तरी इंदापूर तालुक्यात सुप्रिया सुळे यांचे पारडे जड असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. निवडणूक जशी जशी जवळ येईल तशी तशी प्रचारात रंगत वाढणार आहे. आयाराम गयारामाची संख्या देखील वाढणार आहे. आतापासूनच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झढताना दिसत आहेत. यामुळे मतदारांची करमणूक देखील होत आहे.

मतदाराने मतदान कुणाला करायचे हे आपल्या मनामध्ये निश्चित केले आहे तशा प्रतिक्रिया बेधडकपणे बोलून दाखवीत आहेत.यावेळी

योगेंद्र दादा पवार, सागर मिसाळ जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय ,तेजसिहं पाटील तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष,महारुद्र पाटील कार्याध्यक्ष,अमोल भिसे प्रदेश सरचिटणीस, अरबाज शेख प्रदेश उपाध्यक्ष युवक आघाडी,अशोक भाऊ घोगरे ज्येष्ठ नेते, छाया ताई पडसळकर तालुकाध्यक्ष महिला आघाडी ,रेश्मा शेख शहराध्यक्ष ,रुपाली रणदिवे शहर कार्याध्यक्ष, तमन्ना शेख शहर सरचिटणीस,

नितीन शिंदे शिवसेना तालुकाध्यक्ष,तानाजी भोंग तालुकाध्यक्ष कॉग्रेस,नितीन राऊत, अमोल मुळे, आम आदमी पार्टी सर्व पक्षाचे पधादिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *