दिनांक ९ मार्च 

 

 

 

बीड येथील भाजिमंडई कार्यालयात  

लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या प्रदेश व जिल्हा कार्यकारणी नुकतीच सं.अ. भागवत वैद्य यांच्या आदेशाने महिला प्रदेश कार्याध्यक्ष ॲड. दैवशाला शिंदे, यांच्या अध्यक्षतेखाली व सुनील भोसले प्रदेशाध्यक्ष भटक्या विमुक्त आदिवासी विकास समिती, बीड जिल्हाध्यक्ष दत्तात्रय हंडीबाग, प्रदेश सचिव महिला आघाडी सना खान यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आल्या. .यावेळी प्रदेश व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

लोकशाही पत्रकार संघ हा पत्रकारांसाठी तर धावून येणार आहेच परंतु समाजातील विविध स्तरातील घटकांसाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील पहिलाच पत्रकार संघ आहे की जो समाजासाठी काम करतोय. संघाच्या याच नावलौकिका मुळे दररोज लोकशाही पत्रकार संघामध्ये सामील होण्यासाठी पत्रकारांचे महाराष्ट्रातून फोन येत आहे.

 लोकशाही पत्रकार संघाच्या पोलीस विकास समिती प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच निवड झालेल्या राणीताई शेख

आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आज लोकशाही पत्रकार संघामध्ये निवड झालेल्या सर्व पदाधिकारी संघाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार आहोत तसेच पोलीस बांधवांच्या काही मागण्या आहेत त्यासाठी देखील लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने काम करण्यात येईल. त्यापुढे बोलताना असेही म्हणाले की शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक व्यवसाय व उद्योग उभारणीसाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल.

पदाधिकारी नियुक्ती वेळी सं.अ. भागवत वैद्य, माणिक वाघमारे प्रदेशाध्यक्ष, हमीद खान प्रदेश सचिव, आयुब खान पठाण प्रदेश कार्याध्यक्ष, रामदास तपसे प्रदेश उपाध्यक्ष,

रवींद्र जाधव प्रदेश उपाध्यक्ष, भोसले,चव्हाण प्रदेश अध्यक्ष भटक्या विमुक्त आदिवासी विकास समिती, अनिस कुरेशी जिल्हाध्यक्ष अध्यक्ष संभाजीनगर, साजिद सय्यद मराठवाडा उपाध्यक्ष, उपस्थित होते सर्वांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य नवनियुक्त पदाधिकारी

राणीताई शेख : प्रदेशाध्यक्ष पोलीस विकास समिती

ॲड. संगीता वीर. : जिल्हाध्यक्ष बीड महिला व बालकल्याण समिती

रंजना नेहारे. : जिल्हाध्यक्ष वर्धा, शेतीपूरक जोडधंदा विकास समिती

अर्पणा झाडे. : जिल्हाध्यक्ष वर्धा, बचत गट विकास समिती

अर्चना कदम. : जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ, शेतीपूरक जोडधंदा विकास समिती

सुजाता उबाळे. : कार्याध्यक्ष पुणे शहर, महिला बचत

गट विकास समिती

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *