दिनांक ७ जून

इंदापूर (दि ७ ) : तालुक्यातील पुर्व भागात उजनीच्या पट्ट्यात पावसाचे दमदार आगमन झाले.कडक उन्हामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरीकांना काहिसा दिलासा मिळाला.
यंदाचा उन्हाळा फार तापदायक होता.चाळीशी पार केलेल्या तापमानामुळे उकाड्याने हैराण झालेल्या वयोवृद्ध व्यक्तींना व नागरीकांना थंडगार गारवा मिळाला. उद्याच (७जून) मृग नक्षत्राचे आगमन होत आहे. खऱ्या अर्थाने पावसाळ्याची सुरुवात झाली आहे. यंदा जेवढा उन्हाळा तापदायक होता तेवढ्याच प्रमाणात पावसाळा देखील असण्याची चाहुलच लागली.
तालुक्याच्या पश्चिम भागात पाण्यासाठी नुकतेच आंदोलन झाले. याच आंदोलनामुळे तालुक्यात खडकवासल्याचे पाणी कालच पोहचले आहे. आणि आज पावसाच्या सरी सुरू झाले आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा आनंदी झाला आहे. उजनीचे पाणी पातळी घटल्याने काहीसा चिंतेत असलेला शेतकरी वर्ग पावसाच्या आगमनाने सुखावला आहे.
