दिनांक १५ जून 

इंदापूर (दि.१५) : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा उन्हाळी सुट्टी संपवुन आज (दि.१५) पहिला दिवस.विविध शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने केले जाते.आज असेच स्वागत साखरे वस्ती येथील शाळेत पहिल्याच दिवशी तेज पृथ्वी ग्रुपच्या वतीने “नवागतांचे स्वागत” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन तेजपृथ्वी ग्रुपचे संस्थापक नानासाहेब खरात होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश साखरे, अंगणवाडी सेविका व माता पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

  कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे नानासाहेब खरात व इतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पूजनाने झाली. प्रथम नवागतांचे स्वागत पुष्प देऊन करण्यात आले त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री. नानासाहेब खरात यांनी सर्व मुलांना लेखन साहित्याचे वाटप केले, यावेळी नानासाहेब खरात म्हणाले की खरंच जिल्हा परिषद शाळा या मुलांना खरंच संस्काराचे खूप मोठे केंद्र आहेत जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाबरोबर संस्कारही मोलाचे मिळतात,.तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून या शाळेसाठी कायमस्वरूपी विद्यार्थ्यांसाठी चांगले उपक्रम असतील ते राबवण्याचा आजपर्यंत आणि इथून पुढेही कायम आम्ही प्रयत्न करू. यावेळी शाळेकडून विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली तर तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना वही पेन खाऊ अंकलपी व इतर शाळेचे साहित्य वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री काकासाहेब जाधव यांनी केले. शेवटी मुलांना गोड खाऊचे वाटप करून कार्यक्रमाचे आभार शाळेतील शिक्षक श्री. मल्लिकार्जुन वच्चे गुरुजी यांनी मांडले. अतिशय उत्साहाच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *