प्रकाश आरडे  : स्वराज्य न्युज

भोसरीचे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री कै. हिराबाई किसनराव लांडगे यांचे नुकतेच निधन झाले. हे समजताच माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे आमदार महेश लांडगे यांच्या भोसरी येथील निवासस्थानी सांत्वन करण्यासाठी गेले असता मातोश्री कै. हिराबाई लांडगे यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना म्हणाले की, लांडगे कुटुंबाचा व आमचा बऱ्याच दिवसाचा जिव्हाळ्याचा संबंध असून  कै. हिराबाई किसनराव लांडगे यांचा  स्वभाव अतिशय करारी बाण्याचा होता. त्या एक आदर्श माता म्हणून परिसरात परिचित होत्या तसेच त्या धार्मिक प्रवृत्तीच्या देखील होत्या, त्यामुळे या परिसरात काही धार्मिक कार्यक्रम असतील तर त्या नेहमी अग्रेसर असायच्या. त्या अतिशय शिस्तप्रिय होत्या व त्यांचा काटेकोर बाणा हा वाखाण्याजोगा होता. निश्चितच त्यांच्या जाण्याने आपण सर्वजण एका आदर्श मातेला मुकलो आहोत. त्यांच्या जाण्याने लांडगे कुटंबियाची अपरिमित अशी हानी झाली आहे,या दुःखातून सावरण्याची शक्ती लांडगे कुटुंबियांना मिळावी अशी भावपूर्ण श्रद्धांजली माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *