दि. २९ नोव्हेंबर

बारामती, दि. २८ नोव्हेंबर, २०२२  येथील महावितरणच्या बारामती परिमंडल कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेच्या वार्ताफलकाचे अनावरण रविवारी (दि. २७) केंद्रिय कार्यकारिणीच्या उपस्थितीत करण्यात आले.

वार्ताफलकाच्या उद्घाटनप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण बागूल, सरचिटणीस संजय खाडे, अभय चौधरी, सौ. किर्ती भोसले, पांडुरंग वेळापुरे, श्रीकृष्ण वायदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सल्लागार गुलाबराव मानेकर, कोषाध्यक्ष तुषार खैरनार, संघटन सचिव प्रवीण कोटोले, सहसचिव संजय चव्हाण, पतसंस्थेचे सचिव दिलीप पवार, परिमंडल अध्यक्ष राजेंद्र धायगुडे, उपाध्यक्ष रविंद्र चौधरी, सचिव सतीश फडतरे, कार्याध्यक्ष विजय गुळदगड यांचेसह पुणे व बारामती परिमंडलातील सभासद अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना संघटनेचे सरचिटणीस संजय खाडे म्हणाले, ‘विद्युत मंडळ काळात स्थापन झालेली व आजही महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यातील अतांत्रिक अधिकाऱ्यांना एकत्र बांधून ठेवणारी संघटना म्हणून ‘महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटने’ला ओळखले जाते. बारामती परिमंडलाच्या निर्मितीनंतर अधिकारी संघटनेची बारामती परिमंडलासाठी स्वतंत्र कार्यकारिणी तयार होणार आहे. येणारा काळ महावितरण कंपनीच्या अस्तित्वाचा असणारा आहे. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी संघर्षासाठी तयार राहावे. महावितरण ही सर्व सामान्य वीज ग्राहकांना रास्त दरात वीज पुरवते. सरकारी कंपनी असल्यामुळे आजवर ग्राहकाच्या हिताला बाधा आली नाही. मात्र खाजगीकरणानंतर सर्वसामान्य ग्राहकाला कोणी वाली राहणार नाही. म्हणून ही कंपनी टिकली पाहिजे व ती टिकविण्यासाठी अधिकारी संघटना कायम संघर्ष करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *