पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी बावडा रोड व निमगाव केतकी रोड या ठिकाणी रात्रगतीसाठी  बावडा पोलीस स्टेशनचे सपोनी नागनाथ पाटील व  पोलीस कर्मचारी यांची नेमणूक केली होती.दरम्यान दिनांक ३० सप्टेंबर रोजी रात्रगस्तीवर असलेले सपोनि नागनाथ पाटील हे बावडा रोड व निमगाव केतकी रोड या दोन्ही ठिकाणी कोबिंग नाकाबंदी करीत असताना,पहाटेच्या सुमारास बावडा भागात खोरोची ते रेडणी रोडने जात असलेली संशयस्पद ओमनी गाडीला (MH-12 AN 6630)थांबवण्याचा प्रयत्न केला असता ती गाडी सुसाट भरधाव वेगाने रेडणी रोडने जाऊ लागली  असता, सदर या संशयस्पद ओमनी ची माहिती पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांना दिल्याने ताबडतोब दुसरी टीम त्या संशयास्पद ओमनी गाडीला कव्हर करण्यासाठी पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी सज्ज करून निमगाव केतकी ते काटी रोडने नाकाबंदी करत आडवी आल्याने सदर संशयास्पद ओमनी टप्प्यात आल्यानंतर पाठलाग केल्याने निमगाव केतकी येथील पान बाजार जवळ गाडी उभी करून गाडीतील इसम अंधाराचा फायदा घेऊन गाडी आडोशाला उभी करून पळून जाण्यात यशस्वी झाले .उभ्या असलेल्या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये  देशी विदेशी दारूचे बॉक्स बेकायदेशीरपणे वाहतूक करीत असलेले दिसून आले. सदर गाडी व देशी विदेशी कंपनीचे दारूचे बॉक्स यांचा पंचा समक्ष पंचनामा करून  ओमनी गाडी क्रमांक MH -12 – AN 6630 इंदापूर पोलीस स्टेशन येथे आणली व अज्ञात तिन्ही  इसम यांच्यावरती विविध भादवी कलमान्वये  २७९,४२७,३४ व  मुंबई दारूबंदी कायदा कलम  ६५(ड) अन्वये चालक व मालक यांच्याविरुद्ध इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला

जप्त करण्यात आलेल्या ओमनी गाडी क्रमांक MH – 12 -AN 6630 किंमत रक्कम रुपये २६०००० व  अवैध बेकायदेशीर वाहतूक करणारे देशी विदेशी दारूचे बॉक्स किंमत रुपये ४५९९०/ असा एकूण मुद्देमाल  ३०५९९०/रू चा पंचा समक्ष इंदापूर पोलीस स्टेशन येथे जप्त करण्यात आला.
सदर ची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, मिलिंद मोहिते,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, गणेश इंगळे, पोलीस उपाधीक्षक बारामती विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, सपोनि नागनाथ पाटील,सपोनि प्रकाश पवार, सहाय्यक फौजदार कदम पोलीस हवालदार गायकवाड,महिला पोलीस हवालदार खंडागळे, पोलीस शिपाई चोरमले, गोसावी, शेख,राखुंडे यांनी मिळून केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *