इंदापूर शहरातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, लोकमान्य नगर, बजरंग नगर, उमाजी नाईक नगर, व आठभाई मळा  येथील महिलांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या सहकार्यातून व माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांच्या संकल्पनेतून मोफत तुळजापूर,अक्कलकोट व येरमाळा देवीच्या दर्शनासाठी आयोजन  केले होते. हे मोफत देवदर्शन वारी मोठ्या उत्साहात  संपन्न झाली वारी मधील सर्व माता-भगिनी व भाविक भक्त यांनी संयोजकांना उत्तम दीर्घायुष्य लाभो देवीच्या चरणी प्रार्थना केली.

मोफत देवदर्शन वारीचे हे पहिलेच वर्ष असताना देखील वारी मधील भाविक भक्तांची कसलेही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी संयोजक दादासाहेब सोनवणे यांच्याबरोबरच माजी नगराध्यक्ष विठ्ठल(आप्पा)ननवरे व माजी उपनगराध्यक्ष धनंजय बाबरस यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते .नवरात्र उत्सवामध्ये महाराष्ट्रातून आलेल्या अफाट गर्दीमध्ये आपल्यातील भाविक भक्त चुकू नयेत यासाठी वारीतील प्रत्येक भाविक भक्तांना  ओळखपत्राची सोय करण्यात आली होती.

मोफत देवदर्शन वारीतील वयोवृद्ध माता भगिनी,लहान मुले यांच्यासाठी थंडगार पाण्याची सोय व फराळ अल्पोपहार यांची देखील उत्कृष्ट सोय करण्यात आली होती. अशा पद्धतीची सोय केल्याचे पाहून वारीतील सर्व भाविक भक्त मनापासून समाधान व्यक्त करीत होते.

देवदर्शन करून इंदापूर शहरात आगमन झाल्यानंतर स्वराज्य न्यूजशी बोलताना संयोजक दादासाहेब सोनवणे व माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे महणाले की,  आमचे नेते प्रदीपदादा गारटकर आम्हास नेहमीच  सांगतात की आपण आपल्या माणसासाठी नेहमी उपयोगी पडले पाहिजे व त्यांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे समाधान व्यक्त झाले पाहिजे हेच आपण कमावलेले पुण्य असते, आणि त्याच प्रेरणेने आम्ही आमच्या जिवाभावाच्या माणसासाठी या मोफत वारीचे नियोजन केले होते. ही वारी निर्वीघ्नपणे पार पडली याचे निश्चितच आम्हास समाधान आहे. पुढील वर्षी याहीपेक्षा मोठ्या संख्येने नवरात्र उत्सवामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणी देवदर्शनाला भाविक भक्तांना मोफत वारीचे नियोजन करणार असल्याचा संकल्प केला आहे. आई तुळजाभवानी निश्चितच या चांगल्या कामासाठी आम्हास बळ देईल याची  आम्हास खात्री आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *