
दांडिया रास उत्सवामुळे टेंभुर्णी पंचक्रोशीतील महिलांच्या आनंदाला भरती
जिजाऊ ब्रिगेड आणि यशस्विनी महिला मंच यांचे वतीने टेंभुर्णी येथील लक्ष्मी-आनंद विद्यामंदिर येथे ‘महाभोंडला व दांडिया रास उत्सवानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन व दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा शिवमती सूरजाताई बोबडे, अनुराधा काकी बोबडे, जयश्री ताबे, धनश्री ढवळे, रत्नमाला शिंदे, अर्चना नेवसे, स्वातीताई पाटील, रुपाली नवले व इतर महिला मान्यवर उपस्थित होत्या.
विविध क्षेत्रातील महिला नवदुर्गा म्हणून सन्मानित करण्यात आल्या. नवदुर्गांमध्ये राजाबाई खुळे, छाया किसन जाधव, शिलाताई पाटील, डॉ. प्राजक्ता सातपुते, मोनाली पोपट पवार (पोलिस उपनिरीक्षक), शेडगे मॅडम, डॉ. स्वराली वरकुटे, पूजा गांधी, मनिषा लकडे (प्रशासकीय अधिकारी) इ.
नवरातोत्सवानिमित्त पारंपारिक पद्धतीने विज्ञानाची कास धरत व कलागुणांना वाव देण्यासाठी विविध खेळ व नृत्यस्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये लहान व मोठा गट, समूहनृत्य, मॉम & डॉटर (मायलेकरं), दांडिया समूह नृत्य अशा स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच स्पर्धेचा निकालही यावेळी घोषित करण्यात आला. यशस्वी विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. टेंभुर्णी आणि परिसरातून महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष सुरजाताई बोबडे महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच तत्पर असतात.
यावेळी सूरजा बोबडे मॅडम यांनी प्रस्ताविक केले. प्रा. गायत्री अडाणे व प्रा. युवराज वजाळे सर यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा. जयश्री कांबळे मॅडम यांनी आभार व्यक्त केले.
सदर उत्सव पार पाडण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड व यशस्विनी महिला मंचाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्या तसेच श्री माऊली शिक्षण संस्थेचे प्राचार्य- शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अतोनात परिश्रम घेतले.
