सामूहिक बलात्कार प्रकरणातील 13 वर्षे फरार असलेल्या एका आरोपीच्या इंदापूर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने पकडून त्याच्या मुसक्या आवळून मोठी कामगिरी केली आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन यांना पाहिजे असलेला फरारी आरोपी याला अटक करण्याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या.त्या अनुषंगाने कारवाई करत असताना गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश माने यांना गोपनीय बातमी मिळाल्यावरून सदर बातमीचा आशय पोलीस निरीक्षक कोकणे यांना सांगून इंदापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सदर घटनेतील आरोपी रामचंद्र उर्फ चंद्या नऱ्या पवार (रा. लवंग ता. माळशिरस जि. सोलापूर) यास सराटी ता. इंदापूर या गावातून अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपीवर सामुदायिक बलात्कार प्रकरणी इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 313/2011 भा. द. वी. कलम 376, 363, 341,34 अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई ही पंकज देशमुख (पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक), गणेश बिरादार (अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग), डॉ. सुदर्शन राठोड (उपविभागीय अधिकारी बारामती), इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत, सहा. पो. फौजदार प्रकाश माने, पोलीस कॉन्स्टेबल अंकुश माने, पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव, पोलीस कॉन्स्टेबल तुषार चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल विशाल चौधर, पोलीस कॉन्स्टेबल गणेश डेरे यांनी केले आहे.
