इंदापूर : विधानसभा निवडणुकीचे फॉर्म भरण्याची मुदत जशी जशी संपत येऊ लागली तसे उमेदवारी फॉर्म भरलेल्यानी प्रवीण माने, हर्षवर्धन पाटील,दत्तात्रय भरणे यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढलाय. गावोगावी वाड्या वस्त्या वर जनसंवाद यात्रा, घोंगडी बैठका,व गावभेट दौऱ्याने मतदारांमध्ये एक प्रकारची संभ्रम अवस्था झाली आहे.
आतापर्यंत निवडणूक फॉर्म भरलेल्या पैकी या तीन उमेदवारांमध्येच प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे. या तिघांनीही आपापल्या परीने तालुक्यातील मतदारांचे केलेली सेवा व केलेल्या कामाच्या जोरावर येणाऱ्या पाच वर्षात प्रलंबित असलेली कामे आपणच कशी पूर्ण करू शकू याची खात्री मतदारांना दिली जात आहे.
नेहमीच चर्चेत असलेला व अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला बावीस गावांचा पाण्याचा प्रश्न हा मुद्दा गेले कित्येक पंचवार्षिक योजनेत चर्चेत राहिला आहे. आत्तासुद्धा हाच मुद्दा या प्रमुख उमेदवाराकडून पुन्हा उपस्थित केला जात आहे. पंचतारांकित एमआयडीसी व त्यात आलेले उद्योग व येणारे उद्योग हाही मुद्दा प्रामुख्याने चर्चेत येत आहे. महत्त्वाचा मुद्दा सुशिक्षित बेरोजगारांची वाढलेली संख्या व त्यावर करण्यात येणारे उपाय यावर नवख्या प्रवीण भैय्या माने यांनी भर दिल्याचे दिसत आहे. समोर असणाऱ्या अनुभवी दिग्गज उमेदवारांवर टीका करण्यापेक्षा या दोघांना मतदार मायबापांनी संधी दिलेली आहे मला एकदा संधी देऊन बघा मी नक्कीच इंदापूर तालुक्यात परिवर्तन घडवून प्रलंबित असणारे सर्व प्रश्न मार्गी लावणार व आपणच आमदार आहात असे काम करून दाखवीन अशी खात्री भर सभेत देत असल्याने गावो गावच्या या ना त्या कारणाने दुर्लक्षित झालेला युवक प्रवीण माने यांच्या गोटात सामील झाल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी अंकिता पाटील यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागरबाबा मिसाळ, महिला तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर, कार्याध्यक्ष आसमा मुलाणी व अनेक हर्षवर्धन पाटील समर्थकासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांची सांगड घालून प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. तर राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांचे अनेक समर्थक व पदाधिकारी यांनीही घोंगडी बैठकाच्या माध्यमातून प्रचाराची राळ उठवली आहे. प्रवीण भैय्या माने यांच्यासाठी उमेदवार प्रवीण माने यांच्यासह सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ दादा माने चुलते कुमारशेठ माने यांच्यासह गावोगावच्या तरुण युवकांनी निवडणूक हातात घेतली आहे.
यंदाची पंचवार्षिक निवडणूक महाराष्ट्रात होणाऱ्या अतिशय संघर्षमय विधानसभा निवडणुक लढतीमध्ये चर्चेत राहणार व संघर्षमय होणार हे हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे.
