इंदापूर : इंदापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे तीन पोलीस कर्मचारी व एक महिला पोलीस कर्मचारी यांना खात्यांतर्गत पदोन्नती मिळालेने पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

 

पदोन्नती झालेले पोलीस कर्मचारी

 

१) के.बी.शिंदे : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

२) सुरेंद्र वाघ : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

३) संजय किसन मल्हारे : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

४) कल्याणी जाधव (खंडागळे) : सहाय्यक पोलीस फौजदार

या पदावर पदोन्नती झाली

 

आज इंदापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह सर्व सहकारी पोलीस बांधवांनी पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खात्यांतर्गत पदोन्नती मिळालेले आपली आणखी जबाबदारी वाल्याचे सांगून पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांनी आमच्या परीने जनतेची जेवढी सेवा करता येईल तेवढी जबाबदारीने पार पाडू अशी यावेळी ग्वाही दिली.

यावेळी पदोन्नती झालेल्या पोलीस बांधवांचा पोलीस खात्यासह विविध राजकीय सामाजिक संघटनेतील जबाबदार पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून व फोन द्वारे शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *