गोवा हिंदी अकादमीच्या वतीने आंतरराष्ट्रीय हिंदी शिक्षक व साहित्यकार संमेलन थायलंडच्या बँकॉक शहरात संपन्न झाले.कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या हिंदी विषयाच्या विभागप्रमुख डॉ. शितल मनोजकुमार माने पवार यांना आंतरराष्ट्रीय हिंदी भाषा वाचस्पती पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले.    

      डॉ. शितल माने पवार यांना जागतिक दर्जाच्या हिंदी भाषा विकास, संवर्धन, संशोधनाच्या आंतरराष्ट्रीय कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल थायलंड मधील भारताच्या दूतावासातील हिंदी विभाग प्रमुख व ग्लोबल इंडिया इंटरनॅशनलच्या प्रमुख शिखा रस्तोगी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

   यावेळी अजय रस्तोगी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष उस्मान मुलानी, संमेलनाध्यक्ष कैलास जाधव, प्रमुख अतिथी ॲड. प्रभाकर औटी, ॲड. विजय गोरडे, राजेंद्र सातपुते, शांताराम पवार हे मान्यवर उपस्थित होते.  

         राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष ,माजी मंत्री व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव ॲड. मनोहर चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे , उपप्राचार्य दत्तात्रय गोळे, डॉ. शिवाजी वीर, डॉ. भीमाजी भोर यांनी डॉ. शीतल माने – पवार यांचे अभिनंदन

केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *