दि. २६ ऑक्टोबर

काल (दि.२५ ) झालेल्या हिंगणगाव ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंगाडे यांची बिनविरोध निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी सरपंच रमेश देवकर यांनी तसे जाहीर केले.

नऊ सदस्य संख्या असणाऱ्या हिंगणगाव ग्रामपंचायत च्या सरपंच पदी रमेश देवकर हे  नागरिकांमधून निवडुन आले होते. तर उपसरपंच म्हणून रमेश देवकर यांच्याबरोबरच उपसरपंच पदि सुयोग देवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच पदाची बिनविरोध निवडीची परंपरा कायम ठेवत साधना देवकर व आता गणेश शिंगाडे यांची निवड झाली.

बिनविरोध निवडून आलेले उपसरपंच गणेश शिंगाडे यांचे सरपंच रमेश देवकर व सर्व सदस्य, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

गणेश शिंगाडे हे तेजपृथ्वी ग्रुप चे राज्य उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे संस्थापक अध्यक्ष अनिताताई खरात व नानासाहेब खरात यांनी त्यांचे पदाधिकाऱ्यांसह अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना अनिताताई खरात म्हणाल्या की तेजपूर्वी ग्रुपचे राज्यांमधील पहिलेच उपसरपंच होण्याचा मान गणेश शिंगाडे यांना मिळाला आहे. त्यामुळे तेजपृथ्वी ग्रुपचे राजकीय क्षेत्रात पदार्पण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *