दि. २६  आॅक्टोबर

भाजपा नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील  यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे विद्यमान तालुका अध्यक्ष स्वप्निल सावंत सावंत यांचा भाजपामध्ये इंदापुरात भाजपा कार्यालयात आज प्रवेश होत आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस मधून भाजपात प्रवेश केल्यापासून इंदापूर तालुक्यात काँग्रेसची दयनीय अवस्था झाली होती. सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपात गेल्यने काँग्रेस पक्ष मोडखळीस आला होता. अशा अवस्थेत स्वप्निल सावंत यांनी काँग्रेस पक्षाचे अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी केविलवाणी धडपड केली, परंतु मोठ्या ताकतीच्या अनुभवी नेत्यासमोर  व पक्षासमोर त्यांची धडपड अखेर व्यर्थ ठरली.

स्वप्निल सावंत या उंमद्या मनाच्या तरुणाने काँग्रेस पक्षामध्ये आपल्या कामाचा व निष्ठेचा ठसा निश्चितच उमटवला होता. म्हणूनच जिल्हा पातळीपर्यंत पक्षाचा प्रमुख पदाधिकारी म्हणून अल्पावधीतच त्यांची मजल गेली.

राज्यामध्ये जरी महाविकास आघाडी असलाी तरी  इंदापुरात मात्र काँग्रेस पक्षाला सत्तेत असताना डावलले गेल्यने निश्चितच  स्वप्निल सावंत या  कर्तुत्ववान उमद्या मनाच्या  पदाधिकारी च्या मनात हि सल होती. परिणामी आज त्यांचा भाजपात प्रवेश होत आहे.

बघुय भाजपात त्यांचा कसा सन्मान होतोय येणारा काळच सांगेल…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *