पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे पक्ष प्रमुख मा.श्री. किरण साहेब साठे यांच्या मार्गदर्शनाखाली “गाव तिथे शाखा,आणि घर तिथे कार्यकर्ता” ही मोहीम राबवत महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखा क्रमांक- 2 चे उद्घाटन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.श्री.राजेश खरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. 

या प्रसंगी पंढरपुर युवक तालुका अध्यक्षपदी श्री. महादेव गायकवाड करकंब शहरअध्यक्षपदी श्री. रमाकांत बडेकर,शाखा अध्यक्षपदी श्री.राम वाघमारे,शहर उपाध्यक्ष पदी ज.अफसर बागवान,शहर सरचिटणीस पदी राजेश वाघमारे तसेच शहर संघटक पदी सद्दाम बागवान यांची निवड करण्यात आली.

सर्व नव निर्वाचित पदाधिकाऱ्यांना पाश्चिम महाराष्ट्र अध्यक्षांच्या हस्ते निवड पत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश वाघमारे यांनी केले तर आभार राम वाघमारे यांनी मानले.यावेळी अनेक मान्यवर आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *