माळशिरस प्रतिनिधी : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे विद्यमान माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी जाधव पाटील यांचे पिलीव जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढविण्यासाठी नाव चर्चेत आले आहे.पिलीव जिल्हा परिषद गटामध्ये सर्वसाधारण जागेसाठी आरक्षण पडले आहे.त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचे बोलले जात आहे.त्यामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या कडून निवडणूक लढविण्यासाठी आघाडीवर नाव असलेले धनाजी जाधव पाटील हे मूळचे मळोली गावचे रहिवाशी आहेत.त्यांनी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या बरोबर गेली पंधरा वर्षे काम केले आहे.नुकत्याच महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या पार पडलेल्या आढावा बैठकीत माळशिरस तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढविण्याची घोषणा पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.त्यामुळे तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गटामध्ये पडलेल्या आरक्षणानुसार उमेदवारांची पडताळणी करण्यास मविसे पक्षाने सुरूवात केली आहे.त्यामध्ये पक्षप्रमुख किरण साठे यांच्याशी एकनिष्ठ असलेले मराठा समाजाचे नेते व महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी जाधव पाटील यांचे नाव आघाडीवर आले आहे. महाराष्ट्र विकास सेना पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढविण्याची कंबर कसली असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यांनी निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली असून तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे येणारी पिलीव जिल्हा परिषद गटाची निवडणूक महाराष्ट्र विकास सेना पक्ष लढविणार आहे की नाही हा येणारा काळच ठरवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *