प्रदिप पाटील :  भिमानगर प्रतिनिधी

माढा तालुक्यातील आढेगांव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच शरद पाटील यांनी सामाजिक बांधिलकीतून दीपावली सणानिमित्त आढेगावांतील २५० कुटुंबांना प्रति कुटुंब ४ किलोप्रमाणे मोफत साखर वाटप केली.
पुणे येथील स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शनचे प्लांट अँड मशिनरी हेड मयूर विजय पाटील यांच्या हस्ते प्रथम ५ कुटूबियांना साखर वाटप केली त्यानंतर घरोघरी जाऊन तरुणांनी साखर वाटप केली. ऐन दिवाळी सणात साखर मिळाल्याने महिला वर्गांनी आनंद व्यक्त केला तर अनेक ज्येष्ठ नागरिक व तरुणांनी शरद पाटील यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी सदाशिव नष्टे, महावीर गाडेकर, संभाजी ब्रिगेडचे तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील, आढेगांव सोसायटीचे चेअरमन अश्विन पाटील, राजकुमार निकम, शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष तेजस पाटील, गव्हर्नमेंट ठेकेदार विजय वाघ, प्रीतम शेळके, दत्ताभाऊ कोळेकर, सुहास पाटील, आकाश वाघ, प्रमोद शिंदे, सुमित शिंदे, तुषार भुजबळ, बाळू वाघ व शंतनू पाटील यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *