इंदापूर : विमान अपघातात मृत्यू पावलेल्या उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पार्थिवावर आज विद्या प्रतिष्ठान बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ पवार यांनी भडाग्नी दिला. यावेळी मा मुख्यमंत्री शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नितिन नविन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मा.केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा.सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व राज्यातील अनेक मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी व दादांवर प्रेम करणारे अनेक चाहते राज्यभरातुन उपस्थित होते.
अजितदादांनी शेतकरी,युवक,महिला,शालेय विद्यार्थी,असे अनेकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मनापासून प्रयत्न केले.
रोखठोक स्वभाव हा त्यांचा स्थायीभाव होता. हातोहात कठीण प्रश्न सोडविण्यासाठी ते माहिर होते. राजकारणात विविध पदावर राहून उत्तम पद्धतीने समाजाचे प्रश्न सोडविता येतात हा आशावाद अनेक तरुणांमध्ये दादांनी निर्माण केला होता. राज्यभरात अनेक तरुण याच एका आशेवर राजकारणात करिअर करण्यासाठी उतरलीचे दिसत होते. आज त्यांच्या चेहऱ्यावर काळजीचे ढग साचल्याचे दिसत होते.व त्यांच्या मनात एकच भावना होती लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे.

