इंदापूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले. तसेच त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे निवास शेळके, जाकीर काझी, चमन बागवान, भीमराव शिंदे, शिवाजी आहेर, शिवाजी करे शिंदे, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
