दि. ३१ ऑक्टोबर

इंदापूर  : प्रतिनिधी : परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.हाता तोंडाला आलेली उभी पिके वाया गेली, परिणामी शेतकऱी प्रचंड अडचणीत सापडला आहे.त्यातच लंपी सारख्या आजाराने जनावरांचे देखील नुकसान झाले आहे. अशा भयानक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना उभारी मिळण्यासाठी अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य व सरसकट नुकसान भरपाई राज्य शासनाच्या वतीने मिळावी, अन्यथा येत्या सात डिसेंबर पासून इंदापूर तहसील कार्यालयासमोर नुकसान भरपाई मिळेपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे  निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे यांनी आज इंदापूर तहसीलदार यांना दिले.

निवेदनात  म्हटले आहे की सन २०२२ झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई चे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई देण्याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दिनांक ०७ डिसेंबर पासून योग्य व सरसकट नुकसान भरपाई मिळेपर्यंत तहसील कार्यालय इंदापूर समोर आमरण उपोषण आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनावर नवनाथ कोळेकर,राम ढिरे,राजू जानकर, तानाजी शिंगाडे,आकाश पवार इत्यादीच्या सह्या आहेत

निवेदनाच्या प्रती पोलीस निरीक्षक इंदापूर यांना देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *