दि. ३१ ऑक्टोबर

सोलापूर :जिल्ह्यातील शिक्षण विभागात कार्यरत असणारे सतत वादाच्य भोवर्यात असनारे लोकसेवक शिक्षणाधिकारी व कालच (दि.३० ) रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांत पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री ना.शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला असे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली.

शिक्षणा सारखे पवित्र ठिकाण सुद्धा भ्रष्टाचाराने बरबटले आहे यामुळे जिल्ह्यासह राज्यत  खळबळ उडाली आहे.

दरम्यान याबाबतची हकीकत अशी की, पाचवी ते आठवीचे वर्ग वाढण्यासाठी एका स्वयंअर्थसहाय शाळेने वर्गवाढीच्या परवानगीची मागणी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे केली होती.

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पैसे द्यायला थोडा विलंब झाला होता. सोमवारी तक्रारदार यांना कार्यालयात बोलावून त्यांच्याकडून आरोपी लोकसेवक किरण लोहार यांनी २५ हजार रुपये स्वीकारले.

दरम्यान परिसरात सापळा रचून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई केली.

दरम्यान रविवारी आरोपी लोकसेवक किरण लोहार यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता.

या प्रकरणातील हकीकत अशी की तक्रारदार हे शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष असून त्यांची उत्तर सोलापूर तालुक्यात एक स्वयं अर्थसहाय्य शाळा आहे. त्यांना इयत्ता आठवी ते दहावी या वर्ग वाढीसाठी यूडायस या प्रणालीत नोंदणी करून प्रस्ताव पुढे शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे पाठवण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांचेकडे प्रस्ताव सादर केला होता त्यानंतर सदर प्रस्तावावर लोहार यांची सही होऊन प्रस्तुत प्रकरण पुढील कार्यवाही करिता शिक्षण उपसंचालक प्राथमिक विभाग यांच्याकडे पाठविण्यासाठी आरोपी लोकसेवक किरण लोहार यांनी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती तक्रारदार यांनी 25000 रुपये लाच देण्याचे ठरले मात्र तक्रारदार यांनी सदर बाबतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रीतसर तक्रार केली होती दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सदर तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर सोमवारी सोलापूर जिल्हा परिषदेच्या कार्यालयात ५ वाजून ४५ मिनिटांनी रोख रक्कम २५००० रुपयांची लाच घेताना आरोपी लोकसेवक किरण लोहार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. सदर प्रकरणी आरोपी लोकसेवक किरण लोहार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

सदरची यशस्वी सापळा कारवाई पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्री राजेश बनसोडे अप्पर अधीक्षक श्री सूरज गुरव, सोलापूर युनिटचे उपअधीक्षक श्री संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री उमाकांत महाडिक श्री चंद्रकांत कोळी यांच्या टीम ने सदरची यशस्वी कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *