
इंदापूर येथील युवक समाजसेवक, सतत समाजसेवेत स्वत:ला वाहून घेतलेले व ज्यांना समाजानेच “आपले मेंबर” हि पदवी बहाल केली आहे असे समाजसेवक अनिल अण्णा पवार यांचा उद्या सोमवारी (दि.७) जन्मदिवसाचे आयोजन भव्य रक्तदान शिबिराबरोबरच विधवा व गरजू महिलांना साडी वाटप, तसेच इयत्ता दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक आपले मेंबर मित्र परिवाराच्या पदाधिकारी यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री भाजपा नेते हर्षवर्धन पाटील , व शुभहस्ते माजी मंत्री, विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आहेत, तसेच राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती प्रदीपदादा गारटकर (रा. काँ. पुणे जिल्हाध्यक्ष) , दयानंद भाऊ इरकल ( पुणे शहर उपाध्यक्ष रा. काँ) , प्रवीण भैय्या माने( मा. सभापती जि. प. पुणे), अॅड. राहुल मखरे( राष्ट्रीय महासचिव बहुजन मुक्ती पार्टी) , राजवर्धन दादा पाटील (संचालक नीरा भीमा सह. सा. का.), अंकिता ताई शहा नगराध्यक्ष इंदापूर न पा), श्रीकांत पाटील (तहसीलदार इंदापूर तालुका), टि. वाय. मुजावर( पोलीस निरीक्षक इंदापूर) , रामराजे कापरे (मुख्याधिकारी इंदापूर नगरपरिषद), भरत शेठ शहा व्हा.चेअरमन कर्मयोगी शं. पा. सह. सा. कारखाना), अशोक इजगुडे (मा. नगराध्यक्ष इंदापूर न. पा) , मधुकर भरणे (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर), प्रकाश पवार (सहाय्यक पोलीस निरीक्षक इंदापूर), रमेश पवार (दुय्यम निबंधक माळशिरस), महादेव सोमवंशी (शहर प्रमुख शिवसेना इंदापूर), साधू देवकर (उपसरपंच ), गणेश पाटील (युवा उद्योजक भिमानगर), कैलास गवळी (कार्याध्यक्ष त्रिदल माजी सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य), राम भैय्या गायकवाड(ए.आर. फाउंडेशन सं. अध्यक्ष म. राज्य), दत्ता गायकवाड (संचालक मकाई सह. सा. का. लि. जिंती), रविराज पवार (तालुकाध्यक्ष माजी सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य),
हे मान्यवर उपस्थित राहणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता भारुडाचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रम वडार गल्ली, बाबा चौक (समाज मंदिर),इंदापूर या ठिकाणी आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आमचे मेंबर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
