दि. ०७ नोव्हेंबर

इंदापूर : इंदापूर शहरातील तरुण समाजसेवक म्हणून ज्याची ओळख संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आहे असे अनिल (अण्णा) पवार यांचा आज वाढदिवस.
अण्णांच्या समाजसेवेबद्दल नेहमीच जनसामान्य, गोरगरीब, कष्टकरी जनतेमध्ये चर्चा असते. कष्टकरी व गोरगरीब लोकांच्या फार छोट्या छोट्या अडचणी असतात. परंतु त्याच अडचणी त्यांच्यासाठी महाकाय डोंगराएवढे असतात. अशावेळी त्या गोरगरीब,नडलेल्या माणसांना एकच आठवण येते ती म्हणजे अनिल अण्णा. त्यांना जाऊन हक्काने अडचण सांगून कशीही सोडवा अशी गळ घालणारी माणसं पाहिल्यानंतर खरोखरच या तरुण समाजसेवक बद्दल मनामध्ये आदरभाव निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
अनिल अण्णा चा जन्म कष्टकरी समाजात गरीब कुटुंबात झाला.लहानपणापासूनच आपण या गोरगरीब व कष्टकरी समाजाची देणे लागतो या भावनेने कमी वयापासूनच अनिल अण्णा च्या समाजसेवेचा प्रारंभ झाला. खऱ्या अर्थाने २०१० साली त्यांनी गोरगरीब रुग्णांना सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध व्हावीत म्हणून मेडिकल व्यवसाय चालू केला. तसे अण्णाचे शिक्षण वैद्यकीय क्षेत्रातीलच वानलेस हॉस्पिटल मिरज या शासकीय कॉलेजमध्ये झाले. पुढील शिक्षण इंदापूर येथील आय कॉलेज मध्ये झाले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच २०११ सालापासून समाजसेवेला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये आपण ज्या भागांमध्ये राहतो त्या भागातील स्वच्छता असेल तर आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही म्हणून तरुण संवगड्यांना सोबत घेऊन साफसफाई तर केलीच, पण माझा समाज शिक्षित झाला पाहिजे व त्याला स्पर्धात्मक जगाचे ज्ञान माहित झाले पाहिजे म्हणून तरुण व होतकरू शालेय शिक्षण घेणारे व शिक्षण पूर्ण झालेले या सर्वांचे बौद्धिक साफसफाई देखील केली. तरुणांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली, परिणामी आज अण्णांच्या नातेवाईकाबरोबरच समाजातील अनेक तरुण उच्चशिक्षित आहेत.
शहराबरोबरच ग्रामीण भागातील तरुण, वयोवृद्ध देखील अण्णांचे काम पाहून अण्णा म्हणजे आमचा आधारवड असे आवर्जून सांगतात. मदत करीत असताना जात-पात जवळचा लांबचा न पाहता स्वतःचा वेळ खर्च करून नडलेल्या माणसाचे काम स्वखर्चातून करून देणारे अण्णा म्हणूनच आधारवड वाटतात हे सत्य आहे.
महापुरुषाच्या जयंती,सनउत्सव, नवरात्र उत्सव ,गणेश उत्सव यासारखे कार्यक्रमाला अण्णा सर्वांचे पुढे असतात. शहरातील समवयस्क मित्रांचे वाढदिवस असतील किंवा ज्येष्ठांचे मग ते कोणतेही क्षेत्रातील असो त्यांना आवर्जून शुभेच्छा देण्यासाठी अण्णा हजर असतात.
कोरोना काळामध्ये सर्व दळणवळण व्यवस्था ठप्प झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली .अशातच कोरोना सारख्या महामारीमुळे माणूस माणसापासून दूर गेला. नाती संपुष्टात आली. बाप- मुलगा -मुलगी -आई- बहीण -बायको -मुली एकमेकापासून दूर राहू लागली. एकमेकाकडे संशयाने पाहू लागले .अशाही काळात अण्णा कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावून धडपडत होते .अण्णाला हक्काने शहराबरोबरच ग्रामीण भागातील माणसं देखील फोन करून आमचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये आहे, त्यांना ऑक्सिजन नाही, बेड नाही किंवा औषध उपचारासाठी पैसा नाही सांगत व अण्णा त्यांना तळमळीने पूर्वत होते. कोरोना रुग्णांना धीर तर देतच होते पण काही रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर स्वतःच्या रक्ताता च्या नात्यातील कोणीही नसताना अण्णा त्या मृताचा रितीरिवाजाप्रमाणे अंत्यविधी करीत असत. एका कोरोना रुग्णाचा मृत्यू उपजिल्हा रुग्णालयामध्ये झाला आहे त्या मृत रुग्णाला दुसऱ्या मजल्यावरून पीपीई किट व मास्क न घालताच खाली आणले हे पाहून बघणारा च्या अंगावर काटा उभा राहिला परंतु अण्णाला याची फिकीर नव्हती.

कोरोना काळात गोरगरीब कष्टकऱ्यांचे हाल अण्णा सारख्या हळव्या मनाच्या माणसाला पाहवत नसल्याने, शहरात कष्टकरी माणसाच्या घरी जाऊन अन्नधान्य कीट वाटप केले.अन्नधान्याचे कीट वाटप करीत असताना फक्त आपल्या शहरातीलच लोक उपाशी नसून बाहेरगावावरून चालत जाणारे अनेक गोरगरीब देखील हाताशपने बघतायत हे बघून अण्णांनी पायी येणाऱ्या जाणाऱ्या रोडवरील माणसांना देखील अन्नधान्याची किट वाटप केले. व त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघुन समाधानी झाले.
इंदापूर मुक्कामी दरवर्षी येणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मध्ये वयोवृद्ध वारकऱ्यांची सेवा अण्णा करीत असतात. वारकऱ्यांना जेवण, राहण्याची सोय, औषध उपचाराची सोय ,आजारी वारकऱ्यांना हॉस्पिटलमध्ये औषध उपचारासाठी मदत करणे अशी कामे अगदी हिरीरीने करीत असतात.
अशा या तरुण समाजसेवकाचा आज वाढदिवस, या वाढदिवसानिमित्त अनिल अण्णा यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभो त्यांच्या हातून समाजसेवा घडो हीच स्वराज्य न्युज तर्फे सदिच्छा.
