दि. ०९ नोव्हेंबर


इंदापूर : केंद्रीय अर्थमंत्री सितारामन या बारामती लोकसभेच्या दुसऱ्या दौऱ्यासाठी येणार असून अर्थमंत्री सीतारामन यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये येणार असल्याची माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल बारामती मतदार संघामध्ये 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी येणार आहेत. 11नोव्हेंबर रोजी ते खडकवासला, भोर , पुरंदर , जेजुरी, बारामती येथे भेटी देणार आहेत तर 12 नोव्हेंबर रोजी बारामती , इंदापूर, दौंड येथे भेटी देणार आहेत.
दिनांक 12 नोव्हेंबर रोजी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल भिगवण येथे सकाळी 11 वाजता मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *