दि. १३ नोव्हेंबर

इदापूर : समाजसेवक अनिल (अण्णा) पवार हे इंदापूर मध्ये सर्वपरिचित व सर्व समावेशक असे व्यक्तिमत्व…… याच व्यक्तिमत्त्वावर गेल्या इंदापूर नगरपालिका निवडणुकीमध्ये कोणताही वरदहस्त नसताना हक्काच्या मतदाराच्या जीवावर भल्या भल्यांना निवडणुकीत घाम फोडून निसटत्या मताने पराभव पत्करावा लागला. याची सल निश्चितच उमेदवार म्हणून अनिल अण्णांना तर असणारच परंतु ज्या मतदारांनी मतदान केले त्यांनाही असणार, म्हणूनच हे सर्व हक्काचे मतदार येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीची वाट बघत असणार व त्याचा वचपा नक्कीच काढणार असे दिसते.

नुकताच अनिल अण्णा पवार यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात आमचे मेंबर मित्र परिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला. या अभिष्टचिंतन सोहळ्यास समाजातील विविध स्तरातील मान्यवरांनी उपस्थिती लावून अण्णा करीत असलेल्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. यामध्ये माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही अनिल अण्णा म्हणजे शंभर नंबरी सोने असल्याचे शिक्कामोर्तब केले असल्याने नगरपालिका निवडणुकीत हमखास निवडून येणारा उमेदवार म्हणून अण्णा कडे राजकीय पक्षाचे लक्ष असल्याचे दिसते.

हे सर्व घडत असताना अनिल अण्णा मात्र शांत डोक्याने निर्णय घेणार हे मात्र निश्चित. …. अनिल अण्णा बोलत असताना नेहमी सांगतात माझ्यासाठी राजकीय पक्ष महत्त्वाचा नसून माझी जीवाभावाचे समाज बांधव व मला प्रेमाने व आपुलकीने हक्काचा माणूस म्हणून बघत असणारी जनता हेच माझे सर्वस्व असल्याने जोपर्यंत माझी ही जीवाभावाची माणसं मला सांगत नाहीत की अण्णा तुम्ही एखाद्या पक्षात प्रवेश करावा तोपर्यंत मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. ….

अनिल अण्णा पवार यांचा संपर्क ते स्वतः राहत असलेल्या प्रभागाबरोबरच संपूर्ण इंदापूर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात देखील आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अनिल अण्णाला सर्वसामान्य लोकांचे समर्थन मिळत असून आपल्या हक्काचा माणूस नगरपालिकेच्या सत्तेत असावा अशी भावना आहे.

एक मात्र निश्चित अनिल अण्णा कोणत्याही राजकीय पक्षात जावो अथवा न जावो परंतु नगरसेवक होणारच ही काळ्य दगडावरची रेघ आहे.

बघूया अनिल अण्णा ची भूमिका लवकरच स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *