दि. १५ नोव्हेंबर

इंदापूर : शिवदास सदाशिव भोसले (वय ८३) राहणर पळसदेव तालुका इंदापूर हे ज्येष्ठ सोमवार (दि ७) पासून बेपत्ता असल्याची तक्रार ज्येष्ठची नात स्नेहल रामचंद्र चव्हाण यांनी इंदापूर पोलिसात ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सविस्तर माहिती अशी शिवदास सदाशिव भोसले हे पळसदेव येथून राहत्या घरातून सोमवार (दि ०७) रोजी पळसदेव मधीलच बँकेमध्ये पैसे काढण्यास गेले असता, बँकेतून पैसे काढल्यानंतर तेथूनच बेपत्ता झाले आहेत असे स्नेहल रामचंद्र चव्हाण यांनी सांगितले व तक्रारीत नमूद केले आहे.

त्यांचे वर्णन पुढील प्रमाणे…..
अंगात पोशाख – पांढऱ्या रंगाचे धोतर,ओपन शर्ट व टोपी असा असून चेहऱ्यावर पांढऱ्या रंगाच्या मिश्या व डोळ्यावर चष्मा असा आहे. कोणाला आढळून आल्यास इंदापूर पोलिसात संपर्क साधावा किंवा नातेवाईक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्कासाठी फोन नंबर
०२१११ – २२३३३३ ( इंदापूर पोलीस स्टेशन)
७२४९७४५०६९ ( स्नेहल चव्हाण )
