
इंदापूर ( प्रतिनिधी) : प्रकाश आरडे
—————————————————————–
आज (दि.५ सप्टेंबर ) शिक्षक दिन सर्वत्र साजरा केला जातो. शिक्षक दिनाचे निमित्ताने गुरुप्रती आपली निष्ठा,आदर व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या आयुष्यात असणारे गुरूंचे स्थान व त्या गुरूंनी दाखवलेल्या मार्गामुळे आज जे काही आपले अस्तित्व आहे त्याबद्दल, व आपल्या जगण्याचा कणा व दिशा दाखवणारा गुरु यांच्या विषयी आज विविध क्षेत्रातील उच्चपदस्थां बरोबरच सर्वसामान्य देखील आपली भावना व्यक्त करताना दिसतात.
इंदापूर येथे विद्या प्रतिष्ठान शाळेमध्ये पालक शिक्षक संघाच्य वतीने पालक संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब खरात यांच्य शुभ हस्ते शाळेस अण्णाभाऊ साठे व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा भेट देऊन शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेच्या प्राध्यापक ज्योती जगताप, व इतर सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व शिक्षक व शिपाई कर्मचारी यांना वृक्ष, बाबासाहेबांची लेखणी असणारा पेन व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष नानासाहेब खरात आपल्या मनोगता मध्ये म्हणाले की समाजाच्या देशाच्या जडणघडणेत सत्तर टक्के वाटा हा शिक्षकांचा आहे. शिक्षक जसे मुलाला घडवतील तसेच त्याचे आयुष्य घडते, गुरुच्या मार्गदर्शनावर माणसाचे आयुष्य अवलंबून असते आणि अशा गुरूंचा सत्कार करण्याचे भाग्य आम्हाला आज लाभले हे आमचे भाग्य समजतो असे म्हणाले.
शिक्षक दिनाचा कार्यक्रम शाळेच्या मीटिंग हॉलमध्ये चालू असतानाच पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष नानासाहेब खरात यांचे लक्ष महापुरुषांच्या प्रतिमा लावलेल्या ठिकाणी गेले या सर्व प्रतिमांमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे फोटो नसल्याचे खरात यांच्या लक्षात आल्याने ताबडतोब त्यांनी प्रतिमा आणून शाळेच्या मुख्याध्यापिका प्राध्यापक ज्योती जगताप यांच्या स्वाधीन केल्या व या प्रतिमा इतर महापुरुषां च्या बरोबर लावाव्यात अशी विनंती केली व पुढे बोलताना म्हणाले की आजच्या दिवशी या थोर महामानवांच्या प्रतिमा देण्याचा दुग्ध शर्करा योग आला हे सुद्धा आमचे भाग्यच आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्या प्रतिष्ठानच्या मुख्याध्यापिका प्राध्यापक ज्योती जगताप होत्या यावेळी डॉक्टर राणी ताटे जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी पालक शिक्षक संघाचे सचिव हर्षवर्धन पाटील, ,सलोनी भोसले ,वैभव गटकुळ ,रवींद्र भोंग , डॉक्टर राणी ताटे ,प्रियंका शहा ,वैशाली माने ,इनामदार मॅडम बर्डे सर, ननवरे मॅडम शिक्षक कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी हजर होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा वाघमारे मॅडम यांनी केले.

