दि. ०९ डिसेंबर

इंदापूर : सध्या तालुक्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे . या रणधुमाळीत अवैध व्यवसायाची चांगलीच चांदी असते. प्रचार यंत्रणेतील मतदाराबरोबरच कार्यकर्ते देखील दारू पिणाऱ्याला प्रोत्साहन देतात. परिणामी शांततेत चाललेल्या लोकशाही मार्गातील लोकशाही प्रक्रियेला गालबोट लागून पोलीस प्रशासनावर याचा ताण येतो. अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस यंत्रणा नेहमी सतर्क असते व अवैद्य व्यवसायावर बेधडक कारवाई करून ते बंद पाडले जातात.

इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांना गोपनीय माहिती दारामार्फत इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा हद्दीत बेकायदेशीर हातभट्टी दारू व्यवसाय चालू आहे, असे समजताक्षणी पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी  सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व पोलीस कर्मचारी यांना सोबत घेऊन या वेगवेगळ्या भागातील बेकायदेशीर दारू व्यवसायावर छापा टाकून  दोन लाख  २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर व सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व पोलीस कर्मचारी यांनी राबविलेल्या या बेधडक कारवाईमुळे अवैद्य दारू व्यवसायिकांचे धाबे दणाणले. अवैद्य व्यवसाय करणाऱ्यांना  पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी सळो की पळो करून सोडले असल्यामुळ अवैद्य व्यवसाय धारकांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी बावडा हद्दीतील अवैद्य व्यवसाय धारकांबरोबरच चोरीतील गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावल्यामुळे त्यांचे बावडा परिसरामध्ये कौतुक होत आहे. सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल , अप्पर पोलीस अधीक्षक बारामती आनंद भोईटे , उपविभागीय पोलीस अधिकारी  गणेश इंगळे,  यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक फौजदार के बी शिंदे, युवराज कदम, महिला पोलीस हवालदार खंडागळे, पोलीस हवलदार मनोज गायकवाड, पोलीस नाईक सलमान खान, अमोल गायकवाड, सुनील कदम, आप्पा हेगडे, महिला पोलीस नाईक मुजावर, पोलीस शिपाई विकास राखुंडे, दिनेश चोरमले यांनी मिळून केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *