इंदापूर : इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या व इंदापूर पोलीस स्टेशन दक्षता समिती सदस्या रेशमा शेख यांची मानव विकास परिषद च्या महिला ग्रामीण महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख व कार्याध्यक्ष असलम सय्यद यांच्या हस्ते सणसवाडी (पुणे) येथे संघटनेच्या भरगच्च कार्यक्रमात पत्र देण्यात आले.
रेशमा शेख या इंदापूर व संपूर्ण पुणे जिल्ह्यात महिलांसाठी आक्रमकपणे काम करतात. महिलांच्या प्रश्नावर सतत आवाज उठवितात याच कामाची दखल घेऊन आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्काराने विविध सामाजिक संघटनेच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे, यामध्ये विशेष उल्लेखनीय पुरस्कार राजमाता बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचा समाज गौरव पुरस्कार व राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच नवदुर्गा व आहिल्या रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
रेशमा शेख या जात धर्म याही पलीकडे काम करतात. हिंदू – मुस्लिम सण उत्सवामध्ये त्या हिरीरीने भाग घेतात. महापुरुषांच्या जयंती मध्ये त्यांचा नेहमी पुढाकार असतो. सध्या त्या इंदापूर पोलीस स्टेशन दक्षता समिती सदस्या व रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक पालक समितीच्या उपाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मिळालेले पद हे त्यांच्या निस्वार्थ व प्रामाणिक पणे करत असलेल्या कामाची दखल आहे.
स्वराज्य न्युज शी बोलताना रेशमा शेख म्हणाल्या की  आगामी काळात मिळालेल्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची अडलेली कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.त्यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *