दि. ३१ डिसेंबर
   इंदापूर : ३१ डिसेंबरच्या  रात्री नविन वर्षाचे स्वागत करताना  मद्यधुंद तरुणांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी नेहमीच पोलीस प्रशासन घेत असते व आज या अनुषंगाने इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व सहकारी पेट्रोलिंग करीत असताना अवैदयरित्या बेकायदेशीर देशी-विदेशी व हातभट्टी दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सदरची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना देऊन त्यांच्या आदेशाने मौजे काटी तालुका इंदापूर येथील दोन इसम व रेडणी तालुका इंदापूर येथील एका इसमाच्या राहत्या घरी धाड टाकून देशी विदेशी व अवैदय हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. सदरच्या प्रोहिबिशन रेड मध्ये एकूण १८३००/-रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरील इसमांवरती महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय श्री. अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती श्री. आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग श्री गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, यांच्या  मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक फौजदार के बी शिंदे,  महिला पोलीस हवालदार लडकत,  पोलीस कॉन्स्टेबल अमोल गायकवाड, पोलीस शिपाई दिनेश चोरमले व मोहन आनंदगावकर यांनी मिळून केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *