प्रकाश आरडे : स्वराज्य न्युज इंदापूर

दि. ०९ सप्टेंबर
महाराष्ट्रात सर्वत्र आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक गणपती विसर्जन होत असते .या गणपती विसर्जनामध्ये कोणत्या शहरात, खेड्यामध्ये कसलाही अनुचित प्रकार घडू नये या सार्वजनिक सोहळ्याला गालबोट लागु नये किंवा अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलीस प्रशासनावर असते ,त्यासाठी पोलीस प्रशासन नेहमी सावधगिरी मध्ये असते. गावगुंड समाजकंटक यांच्यापासून सार्वजनिक सोहळ्यामध्ये सामील असणारे गणपती भक्त बाप्पांना निरोप देण्यासाठी तल्लीन झालेले असतात याच संधीचा फायदा घेऊन काही गावगुंड व समाजकंटक गर्दीत घुसून अनुचित प्रकार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी पोलीस प्रशासन चोख बंदोबस्त डोळ्यात तेल घालून राबवतोय.
काल याच पार्श्वभूमीवर इंदापूर पोलीस स्टेशनचे सरसेनापती पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी शहरांमध्ये सर्व गणेश भक्तांना दिलासा मिळेल असेच कृत्य केल्याने शहरात व तालुक्यात चर्चेचा विषय ठरला .काल भर पावसात आपल्या पोलीस बांधवांना सोबत घेऊन संपूर्ण शहरांमधून पथसंचलन (रूट मार्च) करून तमाम गणेशभक्त व इंदापूर शहरवासीय यांना पोलीस आपल्या सोबत आहेत बप्पांना निरोप अतिशय आनंदात द्यावा, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची जणू साक्षच दिली.
खरोखरच पोलीस बांधव हे सामान्य जनता व सामान्य माणसं यांच्यासाठी नेहमीच कार्यरत असतात याचा प्रत्यय खरोखर पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर हे इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आसलेपासुन याचा अनुभव येतोय. पूर्वी पोलीस स्टेशनच्या समोर सामाजिक संघटना व सामान्य जनता यांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच उपोषणाचे मंडप बघायला मिळत होते. परंतु कर्तव्यदक्ष अधिकारी असल्यानंतर न्याय मागण्यासाठी येणाऱ्या अन्यायग्रस्ताची काय समस्या आहे, याच्यावर मार्ग कसा काढता येईल याचा सविस्तर आराखडा त्या अधिकाऱ्याजवळ असेल तर कोणताही कठीण प्रसंग चर्चेतून सुटतो व न्याय मिळतो व न्यायासाठी वर्षानुवर्ष न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतात तोपर्यंत त्या अन्यायग्रस्ताचे मानसिक संतुलन बिघडून त्याच्या कौटुंबिक प्रगतीत अडथळा येतो,हे होऊच नये यासाठी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी वेगळाच पायंडा पाडलेला दिसत आहे.या आपले स्वागत आहे आपली काय समस्या आहे ? हे शांत डोक्याने ऐकून घेऊन त्यावर मार्ग काढण्याची हातोटी या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याजवळ असल्यामुळे अन्यायग्रस्त हसऱ्या चेहऱ्याने पोलीस स्टेशन मधून बाहेर पडताना दिसत आहे याचे निश्चितच समाधान वाटते. मध्यंतरीच्या काळात काही कौटुंबिक अडचणीमुळे साहेब रजेवर गेल्यामुळे प्रभारी पोलीस निरीक्षक आल्याने तालुक्यात व सर्वसामान्य जनतेमध्ये या कर्तव्यदक्ष अधिकाअधिकाऱ्ची बदली झाली की काय? याची उलट सुलट चर्चा होती परंतु पुन्हा एकदा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचे आगमन झाल्यामुळे सर्वसामा न्य जनतेला व समाजातील सर्व जबाबदार घटकांना समाधान वाटले व तुमच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची या पोलीस स्टेशनला गरज आहे हे या सर्वांनी मिळून आपल्या कृतीतून साहेबांना दाखवून दिले. निश्चितच पुढील काळात या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची जनतेच्या प्रति फार मोठी जबाबदारी आहे व ही जबाबदारी साहेब निश्चितच चोखपणे पार पडतील यात शंकाच नाही.
पोलीस निरीक्षक टीवाय मुजावर सर्वसामान्यांना न्याय देत असताना त्यांच्या समवेत असणारे सपोनी ज्ञानेश्वर धनवे, प्रकाश पवार,महेश माने, नागनाथ पाटील, दाजी देठे, सुधीर पाडुळे, पोलीस नाईक सलमान खान, मोहम्मदअली मडी, बापू मोहिते ,सुरेंद्र वाघ ,मनोज गायकवाड ,विशाल चौधर, विनोद काळे, सुरज गुंजाळ, तसेच गोपनीय विभागाचे पोलीस हवलदार प्रवीण भोईटे, लखन साळवी, समाधान केसकर व पोलीस कर्मचारी यांची मोलाची साथ मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *