दि. २० ऑक्टोबर

आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मागणीला यश

 

 

 इंदापूर : पुणे येथे नीरा डावा व खडकवासला कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे उजनी जलशयामध्ये मत्स्यबीज सोडण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. 

उजनी जलाशय हा जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत असल्याने सदर विभागाची मागणी मत्स्य विभागाकडे निधी उपलब्ध करून देण्याबाबत होत असते.परंतु मत्स्य विभाकडे निधी नसल्याने उजनी जलाशयात मत्स्यबीज सोडणे याबाबत काहीच मार्ग निघत नाही. त्यामुळे उजनी जलाशयातील मत्स्य संख्या दिवसेंदिवस कमी झाल्याने काही दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यातील भोई समाजाने आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे मत्स्यबीज सोडण्याबाबतची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन आमदार दत्तात्रय भरणे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे याबाबत निधी उपलब्ध करून देणेबाबत आग्रही मागणी केली. यावर पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून उजनी जलाशयात मत्स्यबीज सोडण्यासाठी निधी 8 दिवसांत उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वस्त केले.यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *